हिंगोली सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयात दोघांना9 हजार रुपयाची लाच घेताना पकडले

 हिंगोली सार्वजनिक न्याय नोंदणी  कार्यालयात दोघांना9 हजार रुपयाची  लाच घेताना पकडले
 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
17 मार्च 2025
 हिंगोली येथील  नोंदणी कार्यालयात कुलभूषण चंद्रकात रोठे,वय 47 वर्षे, पद शिपाई, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, हिंगोली 
रा. विठ्ठल नगर, दिनभाई विद्यालयाचे पाठीमागे, डीग्रस ता. डीग्रस जि. यवतमाळ. ( वर्ग 4 )
सुनील प्रल्हादराव हटकर वय 43 वर्ष, खाजगी इसम रा. कमलानगर, अंधारवाडी रोड, ता. जि.हिंगोली
या दोघांना पैसे घेताना रंग्यात पकडण्यात आले  
 तक्रारीचे स्वरूप
 यातील तक्रारदार हे महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पुसेगाव ता. सेनगाव जि. हिंगोली या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहे. दिनांक 08/03/22 रोजी सहा. धर्मदाय आयुक्त, हिंगोली यांनी  त्यांच्या संस्थेचे रजिस्ट्रेशन रद्द केले होते म्हणून त्यांनी सहा.  धर्मदाय आयुक्त कार्यालय, हिंगोली येथे अपील दाखल केले होते. तक्रारदार यांचे संस्थेच्या रजिस्ट्रेशन बाबत सुनावणी होऊन सहा. धर्मादाय आयुक्त यांनी तक्रारदार यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे. सदर निकालाची प्रत अद्याप पावतो तक्रारदार यांना मिळालेली नाही. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय हिंगोली येथून निकालाची प्रत मिळणे करिता तक्रारदार यांनी रीतसर अर्ज केला होता. दिनांक 12/03/25 रोजी तक्रारदार यांचे ओळखीचे खाजगी इसम सुनील हटकर  यांनी तक्रारदार यांना फोन करून कळविले की, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय हिंगोली, येथील रोठे साहेबांनी "तुमचं काम करून देण्यासाठी 10,000  रू लागतात" असा निरोप तक्रारदार यांना दिला. त्यावरून तक्रारदार यांनी लोकसेवक रोठे यांची प्रत्यक्ष  जाऊन भेट घेतली असता, लोकसेवक रोठे यांनी तक्रारदार यांचे काम त्यांचे ओळखीने करून देण्याचे आश्वासन देऊन सदर कामाकरीता 10,000 रु लागतील असे म्हणून लाचेची मागणी केली. तक्रारदाराची त्याप्रमाणे तक्रार दि.12/03/2025 रोजी प्राप्त झाली होती.

4) *तक्रारीची पडताळणी* :-
  दिनांक 12/03/2025 रोजी सदर तक्रारीची  पडताळणी केली असता, यातील आरोपी क्रमांक 1 कुलभूषण रोठे यांनी तक्रारदार यांचे महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पुसेगाव ता. सेनगाव जि. हिंगोली या संस्थेचे निकालाची प्रत देण्याचे तक्रारदार यांना आश्वासन दिले. पडताळणीत  लोकसेवक रोठे  यांनी " पाचशे हजार कमी द्या" असे म्हणून पंचासमक्ष  9,000 रु  लाचेची मागणी करून,लाच रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शवली.

सापळा कारवाई दिनांक 17/03/ 2025 रोजी तक्रारदार हे लाचेची रक्कम आरोपी क्रमांक 1 यांना देण्यासाठी त्यांचे  सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, हिंगोली येथे गेले. तेव्हा आरोपी क्रमांक 1 यांनी लाचेची रक्कम आरोपी क्रमांक 2 यांचेकडे देण्यास सांगितली.
त्यानंतर आरोपी 2 यांनी तक्रारदार  यांचेकडून 9,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना लाचेच्या रक्कमेसह   रंग हात पकडण्यात आले आहे.

आरोपीचे अंग झडतीत मिळून आलेल्या वस्तू
1) आरोपी लोकसेवक कुलभूषण रोठे यांचेकडे रोख 25,140/- रू, तसेच सॅमसंग कंपनीचे Galaxy A23 5G मॉडेल व Galaxy A 20  मॉडेल चे दोन मोबाईल.
सुनील प्रल्हादराव हटकर यांचेकडे 9,000 रु लाचेच्या रकमे व्यतिरिक्त 2100 रुपये रोख व सॅमसंग कंपनीचा SM - J 810 G मोबाईल.
 
आरोपीताची घरझडती  यातील आरोपी क्रमांक 1 हे दिग्रस ,तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ येथे राहत असल्याने त्यांचे घरझडती बाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळ यांना ठराव देण्यात आलेला आहे. अद्याप पावेतो माहिती प्राप्त झालेली नाही. माहिती प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्याची तजवीज ठेवली आहे.

इतर माहिती
आरोपी लोकसेवक कुलभूषण रोठे व सुनील हटकर खाजगी इसम यांचे विरुद्ध पो. स्टे. हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 आरोपी लोकसेवक कुलभूषण चंद्रकांत रोटे व आरोपी खाजगी इसम सुनील प्रल्हादराव हटकर यांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले असून पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवली आहे.

सापळा/तपास अधिकारी
श्री.प्रफुल्ल अंकुशकर पोलीस निरीक्षक,लाचलुचत प्रतिबंधक विभाग,हिंगोली
सापळा कारवाईत 
श्री.प्रफुल्ल अंकुशकर , पोलीस निरीक्षक, ASI युनूस शेख , विजय शुक्ला पोह/ ज्ञानेश्वर पंचलिंगे, भगवान मंडलिक, राजाराम फुपाटे, गजानन पवार, तानाजी मुंडे, रवींद्र वरणे, गोविंद शिंदे, मपोह/ योगिता अवचार पो.अं.वाघ चापोह शेख अकबर यांनी सहभाग घेतला होता 




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने