खांबाळा खुन खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता पि. के. पुरी



खांबाळा खुन खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. पि. के. पुरी 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
15 मार्च 2025 
 हिंगोली. वसमत नगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.आर.आर.हस्तेकर यांनी मौजे खांबाळा ता.वसमत नगर, जि.हिंगोली येथील अरोपी ज्ञानेश्वर वि्ठलराव व्हडगीर, गजानन विद्ठलराव व्हडगीर, शिवनंदा भ्र.गजानन व्हडगीर यांची शेषराव हडगीर यांचा खुन केल्याच्या आरोपातुन पुराव्या अभावी केली  निर्दोष मुक्तता केली 
घटनेची सविस्तर माहिती 
 अशी की, मौजे खांबाळा, ता.वसमत नगर, जि.हिंगोली येथील खापरखेडा शिवारामध्ये दि. 27ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास शेतातील धु्यावरील झाडे तोडण्यावरून आरोपी व फिर्यादी अवधुत कुंडलिकराव व्हडगीर व त्याचेआई वड़िल यांच्या आपसामध्ये वाद झाला होता.
या वादामध्ये आपसी तडजोड करण्या करिता व वाद हा आपसामध्ये मिटविण्या करिता दि.27ऑगस्ट 2021 रोजी  शेषराव कुंडलिकराव व्हडगीर हा त्याचे मित्रांना सोबत घेऊन त्याचे काका विट्ललराव पि.नागोराव व्हड़गीर यांच्या आखाड्यावरील शेतात गेला असता त्या ठिकाणी शब्ददिक  बाचाबाची होऊन हाणामारीत   खुनाची घटना  झाली  या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर व्हडगीरने मयत शेषराव व्हड़गीर ह्याच्यामानेवर कृन्हाडीने वार केला व गजानन व्हडगीर याने मयताचा हात धरून ठेवला विङ्ललरा वव्हडगीर यांनी ज्ञानेश्व्वर यास चिथावणी दिली व शिवनंदा व्हड़गीर हिने मिर्ची पावडर मयताच्या डोळ्यात फेकले अश्या आशयाचे आरोप आरोपी विरूद्ध करण्यात आलेले होता खटल्यामध्ये पोलिस स्टेशन कुरुंदा यांनी आवधुत कुंडलीकराव व्हडगीर यांच्या फिय्यादीवरून दि.28/अगस्ट /2021 रोजी कलम 302, 323, 504, 506, 34 भा.द. वी. अन्वये गुर.नंबर 183/2021 अन्वयें गुन्हा दाखल कला होता व त्यांचा तपास करून तपासा अंती दोषारोप पत्र वसमत येथील न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केल्यानंतर खटला हा मा.अतिरिक्त सत्र न्यायाधीश वसमत नगर यांच्या न्यायालयात सुनावणीकरिता वर्ग करण्यात आला होता,
 खटल्यामध्ये सरकार पक्षात्फे एकूण 10 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यातआली त्यामध्ये फिर्यादी सहीत 4 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची देखील साक्ष नोंदविण्यात आली होती परंतु मा.न्यायमुर्तीं श्री. आर. आर.हस्तेकर यांनी सरकार पक्षाच्या एकंदरित पुराव्याचेअवलोकन केल्या नंतर सरकार पक्षातर्फे आरोपी विरूद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध झाला नाही .सरकारी पक्षाच्या पुराव्यातील विसंगरती पाहुन आरोपीची खटल्यातुन नि्दोष मुक्तता केली.
या खटलयामध्ये आरोपी तर्फे हिंगोली येथील विधिज्ञ ॲड श्री.पि. के. पुरी,ॲड.अमित कळासरे यांनी काम पाहीले व त्यांना ॲड,पि.बी. देशमुख, ॲड.बालाजी चालकलवार  ॲड. ज्ञानेश्वर परड़े यांनी देखील सहकार्य किले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने