हिंगोली येथील राज्य राखीव दलाच्या सहाय्यक पोलिस उप निरीक्षकास मारहाण
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
11 मार्च 2025
हिंगोली राज्य राखीव
पोलिस बल गट क्र. १२ मध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षकास पोलिस उपनिरीक्षकाने केलेल्या मारहाण प्रकरणात हिंगोली शहर ठाण्यात पोलिस उपनिरीक्षकासह त्याच्या पत्नीवर कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१२ मधील सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ भानूदास मुसळे हे हजेरी मेजर म्हणून काम करीत असतात ९ मार्च रोजी
राखीव दलाच्या पोलिस उपनिरीक्षकासह त्यांच्या पत्नीवर अदखलपात्र गुन्हा दाखल,
सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ मुसळे यांना तु आमच्या मध्ये का बोलला असे म्हणुन पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गोसावी यांनी शिवीगाळ करून तोंडावर चापटाने मारून मुक्का मार दिल्यानंतर गोसावी यांच्या पत्नीने सपोनि मुसळे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी १० मार्च रोजी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात नागनाथ
मुसळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस उपनिरीक्षक रविंद्र वसंत गोसावी व त्यांच्या पत्नीवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे हे करीत आहेत.
विशेष म्हणजे राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १२ मध्ये चक्क सहाय्यक पोलिस निरीक्षकास केलेल्या मारहाण प्रकरणामध्ये संबंधित पोलिस उपनिरीक्षकावर राज्य राखीव पोलिस दलाकडून कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून मिळाली आहे
टिप्पणी पोस्ट करा