धुलिवंदनला रंगाचा बेरंग करणाऱ्यांवर होणार मोठीं कारवाई !पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचा इशारा

 धुलिवंदनला रंगाचा बेरंग करणाऱ्यांवर होणार मोठीं कारवाई !
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचा इशारा
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
14 मार्च 2025 
हिंगोली : जिल्हाभरात आज
धुलीवंदनाच्या दिवशी रंगाचा बेरंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला असून आज (दि.१४) धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस अधीक्षक राजकुमार केंद्रे, सुरेश दळवे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील
हिंगोली शहर चे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर हिंगोली  ग्रामीण पोलीस ठाण्याचे  पोलिस निरीक्षक श्याम कुमार डोंगरे .यांचे स्वतंत्र पथक कार्यरत राहील. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही कार्यरत राहणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील संवेदनशील भागात राज्य राखीव दलाचे जवान तैनात केले जाणार असून दोन दंगाकाबू पथक तैनात केले जातील. याशिवाय जिल्ह्याभरात ६४
अधिकारी, ३९० पोलीस कर्मचारी, ५३० गृहरक्षक दलाचे जवान, एक दहशतवाद विरोधी पथक व दोन बॉम्ब शोध व नाशक पथक गस्तीवर राहणार आहे. याशिवाय जिल्हाभरात दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे. वाहनांमध्ये अवैधरित्या मद्य वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच, ब्रीथ अनालायझरद्वारे वाहन चालकांची तपासणी केली जाईल. मद्य पिवून वाहन चालवणाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले जातील. दरम्यान, होळीच्या पार्श्वभूमीवर पाच जणांवर हद्दपारची कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय आणखी काही जणांवर लवकरच हद्दपारची कारवाई केली जाणार असे   पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले

Post a Comment

أحدث أقدم