प्राचार्य पंजाब गव्हाणे सह दोघांना चार हजार रुपयाची लाच घेताना रंगे हात पकडले
लाच लूचपत विभागाची कारवाई
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
05 मार्च 2025
घटनेची सविस्तर माहिती अशी
पंजाब तुकाराम गव्हाणे,वय 49 वर्षे, संस्थापक तथा प्राचार्य, स्व.राधाताई मुसळे, कनिष्ठ महाविद्यालय लिंबाळा मक्ता,ता . जि.हिंगोली
रा.औंढा रोड, विवेकानंद गुरुकुल, लिंबाळा मक्ता ,ता. जि. हिंगोली.
गोपाल विठ्ठल कोंगे वय 32 वर्ष खाजगी इसम रा.वायचाळ पिंपरी ता.सेनगाव जि.हिंगोली
तक्रारदार यांच्या मुलाची बारावीची परीक्षा स्व.राधाताई मुसळे जुनिअर कॉलेज लिंबाळा मक्ता ता.जि. हिंगोली येथे सुरू आहे. दिनांक 27/02/2025 रोजी तक्रारदार यांच्या मुलाने परीक्षेला जाताना सोबत मोबाईल घेऊन गेला होता.
पेपर सुरू झाल्यानंतर पर्यवेक्षकांनी तक्रारदार यांच्या मुलासह इतर सर्व परीक्षार्थी मुलांचे मोबाईल जमा करून, सदरचे मोबाईल यातील आलोसे पंजाब गव्हाणे यांच्याकडे जमा केले होते. सदर मोबाईल परत घेण्यासाठी तक्रारदार यातील आलोसे पंजाब गव्हाणे यांना दि.28/02/2025 रोजी भेटले. तेव्हा आलोसे पंजाब गव्हाणे यांनी तक्रारदार यांच्या मुलाचा मोबाईल परत करण्यासाठी 5000/- रुपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार दि.28/02/2025 रोजी प्राप्त झाली आहे.
तक्रारदार यांनी दिनांक 28/02/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,हिंगोली येथे लिखित तक्रार दिली . त्या अनुषंगाने दिनांक 28/02/2025 रोजी सदर तक्रारीची पडताळणी केली असता, यातील आरोपी क्रमांक 2 गोपाल कोंगे खाजगी इसम यांनी आरोपी लोकसेवक पंजाब गव्हाणे यांचे सांगण्यावरून तक्रारदार यांच्या मुलाचा मोबाईल परत करण्यासाठी 5000 रू लाचेची पंचासमक्ष मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी आलोसे पंजाब गव्हाणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन काही पैसे कमी करण्यास सांगितले. तेव्हा आलोसे पंजाब गव्हाणे यांनी हजार - पाचशे कमी द्या असे म्हणून लाचेची मागणी करून,लाच रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शवली.
सापळा कारवाई-दिनांक 05/03/ 2025 रोजी
तक्रारदार हे लाचेची रक्कम देण्यासाठी स्व. राधाताई मुसळे, कनिष्ठ महाविद्यालय लिंबाळा मक्ता ता.जि. हिंगोली येथे पंचासह गेले असता आरोपी लोकसेवक पंजाब गव्हाणे यांनी तक्रारदार यांचेकडून 4,000 रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारून ,तक्रारदार यांच्या मुलाचा मोबाईल परत केला. त्यांना लाचेच्या रक्कमेसह पकडण्यात आले आहे.
आरोपीचे अंग झडतीत मिळून आलेल्या वस्तू*: -
आरोपी लोकसेवक पंजाब गव्हाणे यांचेकडे 4000 रू लाचेची रक्कम व त्या व्यतिरिक्त रोख 9690/- रू, तसेच सॅमसंग कंपनीचा फिकट गुलाबी रंगाचा S 53 मॉडेलचा मोबाईल.
आरोपीताची घरझडती आरोपी लोकसेवक पंजाब गव्हाणे यांचे औंढा रोड विवेकानंद गुरुकुल, लिंबाळा मक्ता, ता.जि. हिंगोली येथील निवासस्थानाची घरझडती घेतली असता,आलोसे पंजाब गव्हाणे यांचे घरझडतीमध्ये इतर परीक्षार्थी मुलांचे विविध कंपनीचे 14 अँड्रॉइड मोबाईल मिळाले आहेत. याबाबत अधिक तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. घर झडती करताना फोटो व व्हिडिओ शूटिंग करण्यात आलेले आहे.
आरोपी लोकसेवक पंजाब गव्हाणे व गोपाल कोंगे खाजगी इसम यांचे विरुद्ध पोस्ट हिंगोली ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आरोपी लोकसेवक पंजाब गव्हाणे यांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवली आहे.
हिंगोली लाचलुजपत विभागाची कारवाई मध्ये
श्री .प्रफुल अंकुशकर , पोलीस निरीक्षक, ASI युनूस शेख , विजय शुक्ला पोह/ ज्ञानेश्वर पंचलिंगे, भगवान मंडलिक, राजाराम फुपाटे, गजानन पवार, तानाजी मुंडे, रवींद्र वरणे, गोविंद शिंदे, मपोह/ योगिता अवचार चापोह शेख अकबर यांनी सहभाग घेतला होता
إرسال تعليق