सेनगाव पंचायत समिती गैरव्यवहार बंडाळे. गव्हाणकर. शिंदे .शर्मावर या
कर्मचाऱ्यांवर ४३.७७ लाख रुपयांच्या अपहाराचा पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
5 मार्च 2025
सविस्तर माहिती अशी की
गैरव्यवहार केल्या प्रकरणी चौघांवर ४३.७७ लाख रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी बुधवारी ता. ५ अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला
हिंगोली जिल्ह्यातील
सेनगाव पंचायत समितीच्या लेखा विभागाने कंत्राटदारांकडून कामगार विमा व इतर रक्कम कपात करून सदर रकमेचे देयक संबंधित विभागाला दिलेच नाही. त्यानंतर देयकाचे धनादेश व त्यासोबतच शेड्यूल लाऊन सदर रक्कम वैयक्तिक खात्यात वर्ग केली होती. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे यांनी चार सदस्यांची
आरोपी दत्ता शिंदे
चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सोमवारी ता. ३ लेखा विभागातील कर्मचारी नितीन शर्मा याला निलंबीत करण्यात आले आहे. तर नितीन बंडाळे, दत्ता शिंदे, अनिल गव्हाणकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
आरोपी नितीन शर्मा
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात देऊन संबंधितांवर अपहाराचे गुन्हे दाखल करावेत असा अहवाल लेखा विभागाने सादर केला होता. त्यानंतर या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिले आहेत.
त्यांचीही चौकशी केली जाणार असून सदर धनादेश कोणी वटवून घेतले याची माहिती घेतली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक शालिनी नाईक यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा