Googal पे, फोन पे आज बंद? देशातील अनेक युजर्सनी केली तक्रार; नेमकी बिघाड काय?

 गुगल पे, फोन पे  आज बंद? देशातील अनेक युजर्सनी केली तक्रार; नेमकी  बिघाड काय?

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
26 मार्च 2025 
Google Pay: भारतामध्ये अनेक यूपीआय वापरकर्त्यांना यूपीआय पेमेंट करताना अडचण येत असल्याचं दिसून आले  आहे.
 गुगल पे आणि फोन पे युजर्सनी याबाबत सोशल मीडियात तक्रारींचा पाऊस पाडल्याचे दिसून आले आहे

डाऊनडिटेक्टरनेही या वृत्ताला  दुजोरा दिलेला आहे.

भारतामध्ये लाखो लोक यूपीआय अर्थात युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसचा वापर करतात. काहींनी तर कॅश बाळगणं सोडून दिलं आहे. भाजीवाल्यांपासूरन ते एसटीच्या तिकिटांपर्यंत यूपीआय पेमेंटचा वापर होतो आहे. त्यामुळे त्यात काही बिघाड झाला तर वापरकर्त्यांची मोठी गोची होते.
आज बुधवारी 
 २६ मार्च रोजी सायंकाळच्या दरम्यान अनेक युजर्सना यूपीआय पेमेंट करताना अडचणी निर्माण झाल्या. अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत नाराजी बोलून दाखवली आहे. सायंकाळी ७ नंतर यूपीआय पेमेंटबाबात साधारण २३००० हजार पेक्षाही  तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली  आहे 
  

Post a Comment

أحدث أقدم