5 हजार रुपयाची लाच घेताना ग्रामसेवकास रंगे हात पकडले


5 हजार रुपयाची लाच घेताना ग्रामसेवकास रंगे हात पकडले 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
15 एप्रिल 2025 

घटनेची सविस्तर माहिती अशी की 
 आरोपी लोकसेवक  मोहन गणपत जाधव, ग्रामसेवक, वर्ग-3 ग्राम पंचायत,अडोळ ता. सेनगाव जिल्हा हिंगोली रा.कन्हैया नगर,कोर्टाजवळ, लोणार ता. लोणार जिल्हा बुलढाणा

तक्रारीचे स्वरूप
 यातील तक्रारदार हे ग्रामपंचायत आडोळ चे सदस्य असून, त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2019-20 अंतर्गत अहिल्याबाई होळकर सिंचन योजनेतून विहीर मंजूर झाली होती. या विहीर बांधकामाकरिता तक्रारदार यांना सदर योजनेअंतर्गत 2 लाख 99 हजार रुपये मंजूर झाले होते. त्याप्रमाणे सदर विहिरीचे बांधकाम पूर्ण केलेले असून आज पर्यंत तक्रारदार यांना 2,01,924/- रुपये रक्कम अदा करण्यात  आले आहे. त्यांचे कुशलचे बिल ( शेवटचा हप्ता  येणे बाकी आहे, तसेच त्यांचे चुलत काका यांचे जनावराच्या गोठ्याचे शेडचे काम पूर्ण झालेले असून, त्यांचे देखील कुशलचे बिल ( शेवटचा हप्ता ) येणे बाकी आहे. तसेच तक्रारदार यांचे दुसरे चुलत काका यांचे यापूर्वी ग्रामसेवक जाधव यांच्याकडे दाखल केलेल्या घरकुलाच्या प्रस्तावावर ग्रामसेवक यांची सही करून घरकुलाचा प्रस्ताव पंचायत समिती, सेनगाव येथे पाठविणे बाकी होते.
त्या अनुषंगाने तक्रारदार हे त्यांचे कुशलचे बिलावर व त्यांचे चुलत काका यांचे कुशलच्या बिलावर तसेच त्यांचे दुसरे चुलत काका यांचे घरकुलाच्या प्रस्ताव सही करून घरकुलाचा प्रस्ताव पंचायत समिती सेनगाव येथे पाठविणे असल्याने दिनांक 02 /04/ 2025 रोजी लोकसेवक जाधव ग्रामसेवक यांना भेटून  नमूद कुशल बिलावर व घरकुलाच्या प्रस्तावावर सही करण्यासाठी विनंती केली. तेव्हा लोकसेवक जाधव हे तक्रारदार यांना म्हणाले की, " तुम्ही तुमचे व तुमच्या काकाच्या कुशलच्या बिलाचे प्रत्येकी 3000/- रुपये व तुमच्या दुसऱ्या काकाच्या घरकुलाच्या प्रस्तावाचे 2000/- रुपये असे एकूण 8000/- रुपये मला आणून द्या,तरच मी तुमचे व तुमच्या काकाच्या कुशल बिलावर व तुमच्या दुसऱ्या चुलत काकांच्या घरकुलाच्या प्रस्तावावर सह्या करतो. "  असे म्हणून 8000/- रुपये लाचेची मागणी केली आहे. अशी तक्रार  दि.02/04/2025 रोजी प्राप्त झाली होती.

तक्रारीची  तात्काळ पडताळणी
  दिनांक 02/04/2025 रोजी सदर तक्रारीची पंचा समक्ष पडताळणी  केली असता, यातील  लोकसेवक जाधव (ग्रामसेवक )यांनी तक्रारदार यांना त्यांचे कुशलचे बिलावर व त्यांचे चुलत काका  यांचे कुशलचे बिलावर सही करण्यासाठी प्रत्येकी तीन  हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडअंती दोघात तीन हजार रुपये लाचेची मागणी केली . तसेच तक्रारदार यांचे दुसरे चुलत काका यांचे घरकुलाच्या प्रस्तावावर सही करून सदरचे प्रस्ताव पंचायत समिती सेनगाव येथे पाठविण्याकरिता 2000/- रुपये लाचेची मागणी केली.  असे एकूण 5000/- रुपये पंचासमक्ष लाचेची मागणी करून,लाच रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शवली.

सापळा कारवाई दिनांक 15/04/ 2025 रोजी तक्रारदार हे लाचेची रक्कम लोकसेवक जाधव यांना देण्यासाठी त्यांचे सेनगाव येथील खाजगी रूमवर  गेले. तेव्हा तक्रारदार यांनी कामासंबंधी बोलणी केली असता, लोकसेवक जाधव हे तक्रारदार यांना "पेमेंट आणलं का " असे म्हणून लाचेची रक्कम रूम मधील फरताळावर ठेवण्यास सांगून, सदर लाचेची रक्कम 5000/- रुपये स्वीकारले.  त्यांना लाचेच्या रक्कमेसह पकडण्यात आले आहे.

आरोपीचे अंग झडतीत मिळून आलेल्या वस्तू
 रोख 3070/- रू,एक पिवळ्या धातूची अंगठी अंदाजे पाच ग्राम ,तसेच opo कंपनीचे A9 मॉडेलचा मोबाईल.

 
आरोपीची घर झडती
   यातील लोकसेवक हे कन्हैया नगर कोर्टाजवळ, लोणार तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे राहत असल्याने त्यांचे घरझडती बाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांना ठराव देण्यात आलेला आहे. अद्याप पावेतो माहिती प्राप्त झालेली नाही. माहिती प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्याची तजवीज ठेवली आहे.
इतर माहिती
  लोकसेवक जाधव ग्रामसेवक यांचे विरुद्ध पो. स्टे. सेनगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
  यापूर्वी सदर लोकसेवकाविरुद्ध औंढा ना.  पोलिस स्टेशन येथे गु. र. नं. 3046/2015 कलम 7, 13(1), (ड) सह 13 (2)अन्वये गुन्हा दाखल असून गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.

लोकसेवक  जाधव यांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले असून पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवली आहे.
सापळा/तपास अधिकारी
श्री. प्रफुल अंकुशकर पोलीस निरीक्षक,लाचलुचत प्रतिबंधक विभाग,हिंगोली

सापळा पथक
श्री.प्रफुल अंकुशकर , पोलीस निरीक्षक, ASI युनूस शेख ,पोह ज्ञानेश्वर पंचलिंगे, भगवान मंडलिक, राजाराम फुपाटे, गजानन पवार, तानाजी मुंडे, रवींद्र वरणे, गोविंद शिंदे, मपोह योगिता अवचार पो.अं.वाघ चापोह शेख अकबर सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,हिंगोली.


Post a Comment

أحدث أقدم