सतत गुन्हे करणाऱ्या करण मुदीराज गुन्हेगारास एमपीडीए कायद्या अंतर्गत एक वर्षा करीता केले स्थानबद्ध
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
01 एप्रिल 2025
मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली यांनी पाठविलेल्या प्रस्ताव नुसार मा. अभिनव गोयल जिल्हाधिकारी हिंगोली यांनी काढले कार्यवाहीचे आदेश
मा. पोलीस अधीक्षक, श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्हयाचा पदभार स्विकारल्या नंतर सराईत गुन्हेगारा बाबत एमपीडीए अंतर्गत बेधडक कार्यवाही.केली
दरम्यान
मा. पोलीस अधीक्षक, श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली यांनी जिल्हयाचा पदभार स्विकारताच जिल्हयातील सराईत गुन्हेगार व सतत गुन्हे करणाऱ्या विरुध्द कडक कार्यवाहीची भुमिका घेवुन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपीची इत्यंभूत माहिती काढुन ते करत असलेल्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा, फौजदारी प्रक्रीया संहिता व एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे. धोकादायक इसम नामे श्री करण अशोक मुदीराज वय २३ वर्ष रा. गाडीपुरा हिंगोली ता. जि. हिंगोली यांचेवर मागील अनेक वर्षापासुन हिंगोली येथील पो.स्टे. हिंगोली शहर येथे गंभीर स्वरुपाचे शरीराविरुध्दचे एकुण बारा ०८ गुन्हे दाखल असुन तो सतत गुन्हे करीत होता. तो समाजासाठी धोकादायक बनला होता. त्याचे कृत्यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये भिती व
असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. तो गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे करीत असल्याने सामाजिक स्वास्थ्यास व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहोचविणारा धोकादायक इसम बनला होता. म्हणुन मा. पोलीस अधीक्षक, यांचे आदेशाने सदर प्रकरण अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील
हिंगोली शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर
यांच्या पथकाची मोठी कारवाई
श्री एन.बी. पाडळकर पो.स्टे. हिंगोली शहर यांनी श्री अंबादास भुसारे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग हिंगोली शहर यांच्या मार्फतीने नमुद इसमा विरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्या बाबतचा अधिनियम १९८१ (एम.पी.डी.ए.) चे कलम ३ (१) अन्वये कार्यवाहीचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, श्रीकृष्ण कोकाटे यांच्या कडे सादर केला होता. मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली यांनी सदर प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्या कडे पाठविला होता.
मा. जिल्हाधिकारी, हिंगोली श्री अभिनव गोयल यांनी सदर प्रस्तावाची सविस्तर पडताळणी करुन नमुद धोकादायक इसम नामे श्री करण अशोक मुदीराज वय २३ वर्ष रा. गाडीपुरा हिंगोली ता.जि. हिंगोली हा सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरुन धोकादायक व्यक्ती बनल्यामुळे त्यास एम.पी.डी.ए. १९८१ (सुधारणा १९९६,२००९ आणि २०१५) कलम ३ (२) अन्वये एक वर्षाकरीता कारागृहात स्थानबध्दतेचे आदेश निर्गमीत केले पुढील कार्यवाही सुरु असून जिल्ह्यातील
25 गुन्हेगार एम पी डी च्या रडावर
आहेत असे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी
महाराष्ट्र 24 न्यूजला बोलताना सांगितले
إرسال تعليق