चेहरा लपवून खरेदी करणाऱ्या ग्राहकांची चौकशी करा; पोलिस अधीक्षकांचे व्यापाऱ्यांना आवाहन
महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
13एप्रिल 2025
हिंगोली : आपल्या दुकानातील चोरीचे प्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असताना आपला चेहरा लपवित खरेदीचा बहाणा करणाऱ्या ग्राहकांची चौकशी करावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी व्यापाऱ्यांना केले आहे.
येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात हिंगोली शहरातील व्यापाऱ्यांची बैठक १२ एप्रिल रोजी घेण्यात आली. यावेळी पोलिस अधीक्षक कोकाटे बोलत होते. बैठकीस पोलिस उपाधीक्षक अंबादास भुसारे, पोलिस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे, नरेंद्र पडाळकर, सहायक पोलिस निरीक्षक अनंत बनसोडे, जिल्हा विशेष शाखेचे संजय तोडेवाले, गजानन निर्मले यांची उपस्थिती होती.
पोलिस अधीक्षक कार्यालयात झाली बैठक
गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असले तरी जोपर्यत आरोपीची ओळख पटली जात नाही तोपर्यंत त्याच्यावर कारवाई करता येत नाही.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्हीसारखी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असल्याची माहिती
शहरातील सिग्नल यंत्रणा सुरू करावी
शहरातील मुख्य बाजारपेठेत नेहमीच वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे सिग्नल यंत्रणा सुरू करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी यावेळी केली. तसेच एमआयडीसी परिसरात पोलिस चौकी कार्यान्वित करीत शहरातील व्यापाऱ्यांना रात्री दहाऐवजी अकरा वाजेपर्यंत आपली प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यासाठी वेळ वाढवून देण्याचीही मागणीही करण्यात आली.
गांधी चौकातील हातगाड्यामुळे व्यापाऱ्यांना तर पोलिसांच्या कारवाईमुळे हातगाडे वाल्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी, वाढत्या शहरीकरणामुळे भाजी मार्केटला पर्यायी जागेची मागणी करण्यात आली. मोकाट जनावरे, पार्किंगची पर्यायी व्यवस्था आदी समस्याही व्यापाऱ्यांनी मांडल्या. सर्व सूचनांवर लवकरच निर्णय घेण्यात येईल व पुन्हा व्यापाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी दिले.
गुन्हेगारांनासुद्धा झाली आहे. त्यामुळे तो सतत आपला चेहरा लपवित गुन्हेगारी कृत्य करीत असल्याने त्याचा शोध घेताना अडचणी येतात. त्यामुळे आपला चेहरा मास्क, हेल्मेट, रूमाल लावून लपवित खरेदी करण्याचा बहाणा करणाऱ्या ग्राहकांची व्यापाऱ्यांनी चौकशी करावी. जेणेकरून त्यांचा चेहरा सीसीटीव्हीत कैद होईल, असे बैठकीत व्यापाऱ्यांना सूचना दिल्या
टिप्पणी पोस्ट करा