वृध्द महिलेला भांडयाची पेटी फुकट मिळणार जबरीने लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेडयास्था. गु.शा हिंगोली ची कार्यवाही


वृध्द महिलेला भांडयाची पेटी फुकट मिळणार  जबरीने लुटणाऱ्या  आरोपीला पोलिसांनी  ठोकल्या बेडया
स्था. गु.शा हिंगोली ची कार्यवाही

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
14 एप्रिल 2025 
घटनेचे सविस्तर माहिती अशी की 
दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३ वाजण्याचे सुमारास सरकारी दवाखाना, हिंगोली इमारतीच्या बाहेर मोकळ्या जागेत फिर्यादी नामे विमल वामन विसावे, वय ६५ वर्ष, रा. कन्हेरगाव, ता.जि. हिंगोली या वृध्द महिलेस अज्ञात आरोपी इसमाने तुम्हाला रोजगार हमी योजनेची भांडयाची पेटी फुकट पाहिजे असल्यास माइयासोबत चला असे म्हणुन सदर वृध्द महिलेस व तिच्या मुलीस हिंगोली बाहेर आडोश्याला नेवुन जबरीने अंगावरील दागीने काढुन घेतल्याबददल पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल होता.

दरम्यान  गुन्हयाचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक हिंगोली  श्रीकृष्ण कोकाटे  यांनी स्था.गु.शा. पो.नि. श्री विकास पाटील यांना सुचना देवुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमले होते. त्याअनुषंगाने तात्रिक विष्लेशन व गोपनिय माहिती याव्दारे स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीची माहिती काढली असता सदरचा जबरीने चोरी करणारा आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे नागोराव सुखदेव श्रीरामे, वय २८ वर्ष, व्यवसाय बेकार, रा.हनकदरी, ता. सेनगाव असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आरोपीविरूध्द पोलीसांनी सापळा लावुन हिंगोली शहरातुन ताब्यात घेवुन विचारपुस केली असता सदर आरोपीने गुन्हयाची कबुली देवुन वृध्द महिलेच्या अंगावरील जबरीने लुटलेले ५४ तोळे चांदिचे दंडकडे, पाटल्या, काकणे व ०७ ग्रॅम सोन्याची पोत असा एकुण १,३०,०००/- रू चा चोरी गेलेला पुर्ण मुददेमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.
आरोपी हा गंभीर स्वरूपाचा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन यापुर्वी सुध्दा वृध्द महिलांना गाठुन वेगवेगळे बहाणे सांगुन अनेक वेळा जबरी चोरी केली आहे. तसेच एक वृध्द महिलेचा खुन करून अंगावरील दागीने लुटले आहेत. तसेच आरोपी हा यापुर्वी पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र चालवत असल्याने भरतीपुर्व प्रशिक्षणार्थांची फसवणुक करून पैसे लुबाडल्याचे व अनेकवेळा घरफोडी केल्याचे सुध्दा गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे यानंतर सुध्दा सदर आरोपी आपल्या भागात आल्यास नागरीकांनी विशेषतः महिलांनी सतर्क राहण्याबाबत पोलीसांनी अवाहन केले आहे. सदर आरोपीस गुन्हे शाखेच्या पोलीसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने अशा स्वरूपाच्या गुन्हयास प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पो. नि श्री विकास पाटील, स्था.गु.शा. हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. श्री शिवसांब घेवारे, पोउपनि. श्री विक्रम विठुबोने, पोलीस अंमलदार प्रेम चव्हाण, लिंबाजी वाव्हळे, राजु ठाकुर, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आकाश टापरे, दत्ता नागरे, रवी स्वामी यांनी केली आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने