मुलीला फुस लावून पळविणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व २५हजाराचा दंड
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
17 एप्रिल 2025
हिंगोली जिल्ह्यातील सेनगावातील एका
आरोपीने मुलीला लग्नाचे अमिष दाखवून फुस लावून पळवून नेले होते. सदर प्रकरणी सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. १६ एप्रिल रोजी अंतिम सुनावणीत तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधिश पी.जी. देशमुख यांनी आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपयाचा दंड सुनावला.
या बाबत जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. एन.एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव इंदिरा नगर भागातील बालाजी अनिल
तदर्थ जिल्हा सत्र न्यायधिश पी. जी. देशमुख यांनी सुनावला निकाल
गाढवे याने एका मुलीला १. मे २०१८ रोजी सायंकाळच्या सुमारास लग्नाचे अमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याने सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. हे प्रकरण तदर्थ जिल्हा न्यायाधिश पी.जी. देशमुख यांच्या समोर चालले प्रकरणात सहाय्यक सरकारी वकिल
एस.डी. कुटे यांनी ११ साक्षीदार तपासून युक्तीवाद केला. १६ एप्रिलला अंतिम सुनावणीत आरोपी बालाजी अनिल गाढवे याला तीन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड तदर्थ जिल्हा न्यायाधिश पी.जी. देशमुख यांनी शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा एकत्रीत भोगाव्यात असा आदेश झाला आहे. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकिल एन. एस. मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार पक्षातर्फे अॅड. एस. डी. कुटे यांनी बाजू मांडली तर त्यांना अॅड. सविता देशमुख, कोर्ट पैस्वी मुनीर मुन्नीवाले यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق