अवैध वाळुसाठ्यावर हिंगोली पोलीसांची बेधडक कारवाई ८० ब्रास वीस लाख रुपयाचा वाळुसाठा जप्त


अवैध वाळुसाठ्यावर हिंगोली पोलीसांची बेधडक  कारवाई ८० ब्रास वीस लाख रुपयाचा  वाळुसाठा  जप्त

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अवैध वाळु कार्यवाही बाबत ऑलआउट ऑपरेशन 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
03 एप्रिल 2000 2025
हिंगोली जिल्हयातील अवैध वाळु वाहतुक व साठा याविरूध्द कठोर  कारवाई  करण्यासाठी पोलीस व महसुल विभागाचे संयक्तरित्या व स्वतंत्र पथक नेमुन वेळोवेळी कार्यवाही करण्यात येते. तरी सदर कार्यवाही मध्ये आणखी तिव्रता वाढवुन वाळु वाहतुक करणारे व वाळु साठा करणा-या विरूध्द कठोर कार्यवाही करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिनांक ०२/०४/२०२५ ते ०३/०४/२०२५ रोजी मध्यरात्री अवैध वाळु कार्यवाही बाबत अचानकपणे ऑलआउट ऑपरेशन राबविले.
सदर ऑपरेशन मध्ये पोलीस अधीक्षक यांचे सह अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अंबादास भुसारे, श्री. राजकुमारे केंद्रे, श्री. सुरेश दळवे यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनचे ठाणेदार, दुयम अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.

पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे यांनी सदर ऑपरेशन मध्ये जिल्हयातील सर्व वाळु घाटावर जावुन पाहणी करण्याच्या सुचना दिल्या. त्यावरून पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस स्टेशन अंतर्गत असणा-या सर्व वाळु घाटावर जाउन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्वतः पोस्टे सेनगाव अंतर्गत बन बरडा या परिसरात जाउन पाहणी केली, तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांनी हिंगोली शहरालगत असलेल्या महादेव वाडी, नर्सी कुटी या परिसरात जाउन पाहणी केली असता महादेव वाडी परिसरात ८० ब्रास (कि.अं. २० लक्ष रूपये) रेती साठा अवैध पणे नदी पात्रात साठवणुक केलेला आढळुन आला त्यावरून सदर अवैध रेती साठयावर कार्यवाही करण्याबाबत महसुल पथकाला पाचारण करून सदर रेती साठा जप्त करण्यात आला आहे. यानंतर सुध्दा वेळोवेळी पोलीस पथकाच्या वतीने जिल्हयातील अवैध वाळु वाहतुक व साठवणुक करणा-या विरुध्द कठोर कार्यवाही करण्यात येणार असुन सतत गुन्हे करणा-या विरूध्द एमपीडीए अंतर्गत व हददपार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगीतले.

जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली

Post a Comment

أحدث أقدم