हिंगोलीत ९ एप्रिल पासून भगवान महावीर जन्मोत्सवाला सुरवात
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
08 एप्रिल 2025
हिंगोली : जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६२३ व्या जन्मकल्याणक महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून
दिनांक ९ व १० एप्रिल रोजी शहरातील महावीर भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ९ एप्रिल रोजी दुपारी १ ते ४ शुद्ध जैन रेसीपी (आनंदनगरी) चे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता पसिद्ध मोटीवेशनल वक्ते डॉ.एस.पि.भारिल्ल यांचे प्रवचन देखील होनार आहे.
तसेच दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता भगवान 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, राम गल्ली येथून भव्य शोभा यात्रेस सुरुवात होऊन हि शोभायात्रा भगवान शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर, भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, ग्रामीण पोलीस स्टेशन, महावीर कीर्ती स्तंभ, संयम किर्ती स्तंभ, गांधी चौक, खुराणा पेट्रोल पंप मार्गे महावीर भवन येथे समारोप होणार आहे. त्यानंतर लगेचच डॉ. एस.पी भारील्ल यांचे 'मै और मेरे महावीर' या विषयावर मार्मिक प्रवचन होणार असून त्यानंतर महाप्रसादचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या जन्मकल्याणक महोत्सव निमित्त होणार्या सर्व कार्यक्रमाना उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन सकल दिगंबर जैन समाज, हिंगोली यांच्या वतीने करण्यात आला आहे.
दोन दिवस व्याख्यानमालेचे आयोजन
प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर डॉ. एस.पी भारिल्ल राहणार उपस्थित-*
भगवान महावीर यांच्या २६२३ व्या जन्मकल्याणक महोत्सव निमित्त महावीर भवन हिंगोली येथे ''भगवान महावीर व्याख्यानमालेचे'' आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ९ व १० एप्रिल असे दोन दिवस व्याख्यानमाला असून दिनांक ९ एप्रिल रोजी ''इन भावो का फल क्या होगा'' तर १० एप्रिल रोजी ''मै और मेरे महावीर'' या विषयावर मोटिवेशनल वक्ते डॉ.एस पी भारिल्ल हे मार्गदर्शन करणार आहेत या व्याख्यानमालेला उपस्थित राहावे असे अवाहन सकल दिगंबर जैन समाज, हिंगोली यांच्या वतीने करण्यात आला आहे.
إرسال تعليق