हिंगोली जिल्हा विशेष मोक्का न्यायलयाचा ऐतिहासिक निर्णय, मोक्का, गोळीबार प्रकरणातील 10 आरोपींची निर्दोष मुक्तता
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
30 मे 2025
गोळीबार प्रकरणातील सविस्तर माहिती अशी की
३० मे २०२५ – हिंगोली जिल्ह्यातील मोक्का विशेष न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (MCOCA) दाखल असलेल्या गुन्हयामधील 10 आरोपींना निर्दोष मुक्त केले. हा निर्णय हिंगोली जिल्ह्याच्या न्यायिक इतिहासात पहिल्यांदाच विशेष न्यायालयाने दिला आहे, मोक्का कायद्या अंतर्गत हिंगोली जिल्हा न्यायलय येथे खटला चालून निर्णय पारीत झालेले हे पहिले प्रकरण आहे ज्यामुळे या प्रकरणाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे
दि. 23/11/2021 रोजी फिर्यादीने फिर्याद दिली की, दि. 22/01/2021 रोजी फिर्यादी व साक्षीदार असे रात्री 08.50 वा. कळमनुरी येथील नविन बस्थानका जवळ चहा घेत असतांना आरोपी तेथे येवून घोषणाबाजी करून त्यांच्या जवळील तलवारी फिरवुन दहशतीचे वातावरण निर्माण करू लागले तसेच फिर्यादिचा रस्ता अडवुन त्याचा जिव जाईल या उद्देशाने तलवारीने वार केले व गावठी कट्टयातुन फायर करून फिर्यादीला गंभीर जख्मी केले तसेच रस्त्यावर येणारे जाणारे वाहन अडवून त्यांच्यावर दगडफेक केली तसेच दुध डेअरी मध्ये तोडफोड केली आणि नुरी कॉम्प्लेस वरील सी.सी. टि.व्ही. कॅमेरे फोडले आणि इंदिरा नगर येथे घरामध्ये घुसून सामानाची नासधुस केली व इतर लोकांना गावठी कट्टया ने फायर करून जख्मी केले व गंभीर स्वरुपाची मारहाण करून दहशतीचे वातावरण निर्माण केल.
तरी फिर्यादीच्या फिर्यादिवरून पोलीस स्टेशन कळमनुरी येथे गु.र. न. 324/2021 कलम 307, 326, 336, 341, 452, 427, 143, 147, 148, 149 भा.द.वी. सह कलम 4, 25, 3, 27 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
त्यानंतर सदर प्रकरणामध्ये पोलीस अधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनीयम 1999 चे कलम 3(1(ii), 3(2), 3(4) प्रमाणे कलम वाढ करण्यात आली.
तसेच मा. अपर पोलीस महासंचालक यांची परवानगी घेऊन मा. विशेष मोक्का न्यायलय हिंगोली येथे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले ज्याचा स्पेशल केस क्रमांक 14/2021 होता.
तरी सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे एकुण 21 साक्षीदार तपासण्यात आले आणि या प्रकरणतील दहाही आरोपी 1) कर्तारसिंग हत्यारसिंग टाक 2) देवासिंग बावरी 3) रामसिंग टाक 4) सतनामसिंग टाक 5) जहागीरसिंग टाक 6) जुगनसिंग टाक 7) गणेशसिंग टाक 8) बबलु सिंग टाक 9) अजयसिंग टाक 10) गणपतसिंग टाक यांच्या वतीने ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी काम पाहिले.
दिनांक 30/05/2025 रोजी विद्यमान विशेष मोक्का न्यायधिश मा. आर. व्ही. लोखंडे साहेब यांनी दोन्ही पक्षांचा अंतिम युक्तीवाद एकून आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड. ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख , ॲड.राहूल देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. विराज देशमुख, ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा