खुन केल्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीची जामीन मंजूर


 खुन  केल्याच्या गंभीर प्रकरणातील  आरोपीची  जामीन मंजूर

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
14 मे 2025 
खून प्रकरणातील 
सविस्तर माहिती अशी की
     दि. 17 डिसेंबर 2024 रोजी पोलीस स्टेशन हिंगोली कळमनुरी येथे फिर्यादीने फिर्याद दिली की,
दि. 07 डिसेंबर /2024 रोजी फिर्यादीचा मुलगा शेतात चारा आणण्यासाठी गेला होता तरी जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपीने त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने डोळयात विषारी औषध टाकले व विषारी औषध पाजून  छातीवर बसून पोटावर बरगडीवर धारधार हत्याराने मारहाण करुण गंभीर जख्मी केले व जिवे मारण्याचा प्रयत्न केला    
     तरी फीर्यादीच्या फिर्याद वरून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन कळमनुरी येथे गु. र. नं. 672/2024 कलम 109, 123, 118(2), भारतीय न्याय संहीता 2023  कायद्यान्वये  गुन्हा नोंदविण्यात आला होता.
 त्यानंतर फिर्यादीचा मुलगा उपचारादरम्यान मरण पावल्यामुळे सदर गुन्हामध्ये कलम 103(1)भारतीय न्याय संहीता 2023 अन्वये कलम वाढ करण्यात आली होती
 सदरील गुन्ह्यामधील अटक आरोपी नामे पिंटु उर्फ देविदास इशनाजी ढोके यांनी   ॲड अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत  वि. जिल्हा व सत्र न्यायालय  हिंगोली येथे जामिन साठी अर्ज दाखल केला होता.
सदर प्रकरणामध्ये वि. मा. प्रमुख जील्हा व सत्र न्यायाधीश, श्री टी. एस. अकाली  साहेब  यांनी दोन्ही पक्षाचा  युक्तीवाद ऐकून दि. 05/05/2025  रोजी   आरोपीची  नियमीत जामिन मंजूर केली आहे.
आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, ॲड प्रदिप लोंढे, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी  युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख ,  ॲड.राहूल देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم