२० हजारांची मागणी करणारा वनपाल जाळ्यात
वसमत येथे एसीबीची कारवाई
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
16 मे2025
हिंगोली वसमत : लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या
वनपालावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १५ मे रोजी कारवाई केली आहे.
वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनपाल बालाजी पवार हे लाकडांची वाहतूक करणारे वाहन चालू देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे केली होती.
त्यावरून पथकाने येथील वनविभागाच्या कार्यालयात सापळा लावला.
वनपाल बालाजी पवार याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने बालाजी पवार यास ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे
उपविभागीय अधिकारी विकास धनवटे, तानाजी मुंडे, राजाराम पोकाटे, ज्ञानेश्वर पचलिंगे, भगवान मंडलिक, शेख अकबर यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला
إرسال تعليق