हिंगोली जिल्हा परिषदेत बदली प्रक्रिया सोमवारपासून

 हिंगोली  जिल्हा परिषदेत बदली प्रक्रिया सोमवारपासून

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
25 मे 2025
हिंगोली : येथील जिल्हा परिषदेतील
कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या केल्या जाणार असून, या प्रक्रियेस २६ मेपासून प्रारंभ होत आहे.

जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या करण्याच्या अनुषंगाने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी आदेश काढले आहेत.
सोमवारपासून जि.प.च्या सभागृहात समुपदेशनाला प्रारंभ होणार आहे. २६ मे रोजी सकाळी ११ वाजता बांधकाम विभाग, दुपारी १२ वाजता लघुसिंचन, दुपारी १ वाजता ग्रामीण पाणीपुरवठा, दुपारी ३ वाजता महिला व बालकल्याण, दुपारी ४ वाजता कृषी विभागातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांचे समुपदेशन होणार आहे. तसेच २७ मे रोजी सकाळी ११ वाजता पशुसंवर्धन, दुपारी १२ वाजता अर्थ, दुपारी १ वाजता सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांचे समुपदेशन होणार आहे. समुपदेशनासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) अनंतकुमार कुंभार हे समन्वयक म्हणून   नियमानुसार जबाबदारी  पार पाडणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने