हिंगोली जिल्हा यलो अलर्ट
वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
25 मे 2025
आयएमडी मुंबईने दिलेल्या अलर्ट नुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, *हिंगोली* आणि धाराशिव या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून त्यानुषंगाने सर्व जिल्ह्यांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात. आवश्यकता असल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे. तसेच संबंधित यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा