मुलीचे अपहरण करून बलात्कार आरोपींची निर्दोष मुक्तता


 मुलीचे अपहरण करून बलात्कार   आरोपींची निर्दोष मुक्तता

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
18 मे 2025 
 घटनेची सविस्तर माहिती अशी की
     दि. 03/मे/2014 रोजी  पोलीस स्टेशन हिंगोली शहर  येथे फिर्यादीने फिर्याद दिली की, फिर्यादीच्या आईने फिर्यादीची  बहीन हरवल्याची तक्रार दिली होती तरी त्यांना माहित झाले कि आरोपी शे इरफान याने तीच्या बहिनीला लग्न करण्यासाठी जबरदस्तीने अपहरण केले व इतर आरोपींनी त्याला मदत केली 
    तरी फिर्यादीच्या फिर्यादिवरून पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गु.र. न. 59/2014 कलम 366, 34 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
  त्यानंतर सदर प्रकरणामध्ये पिडीतेचा जवाब नोंदवून भा.द.वी. चे कलम 376 प्रमाणे कलम वाढ करण्यात आली.
     सदर प्रकरणामध्ये वि जिल्हा व सत्र न्यायलय हिंगोली येथे सत्र खटला क्र  19/2015 अन्वये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.
     तरी सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे एकुण 9 साक्षीदार तपासण्यात आले आणि या प्रकरणतील आरोपी क्र  1) शेख इरफान शेख इसाक  यांच्या वतीने  ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी काम पाहिले. 
    दिनांक  02/मे/2025 रोजी  विद्यमान न्यायधिश मा. आर. व्ही. लोखंडे साहेब यांनी दोन्ही पक्षांचा अंतिम युक्तीवाद एकून आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
     आरोपीच्या वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड. ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी  युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख ,  ॲड.राहूल देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم