हिंगोलीत अनधिकृत खताचा साठा विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
21 जून 2025
हिंगोली : येथील कृषी केंद्रावर कृषी
विभागाच्या भरारी पथकाने १९ जून रोजी छापा टाकून गोदामाला सील ठोकले. या प्रकरणी कृषी केंद्रचालकाविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
शहरातील मे. गोदावरी कृषी केंद्रात रासायनिक खताची अवैध विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याची माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यावरून
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे
कृषी पथक प्रमुख अतुल वायसे api आनंद बनसोडे .
जि. प.चे मोहीम अधिकारी अतुल वायसे यांच्या पथकाने १९ जून रोजी छापा टाकला होता. यावेळी तपासणी केली असता पीपीएल या भुवनेश्वर ओडिशा या रासायनिक खत उत्पादकाचे डीएपी खताच्या ५० बॅग साठा शिल्लक असल्याचे दिसून आले. अधिक चौकशी केली असता खताची साठवणूक केलेल्या गोदामाचा समावेश खत विक्रीच्या परवान्यामध्ये केला असल्याबाबत कोणतेही दस्तावेज उपलब्ध करून दिले नाही. खताचे खरेदी बिल, साठा पुस्तकात
खताच्या साठ्याची ग्रेडनिहाय नोंद, पॉस मशीनमध्ये खताची आवक, विक्री नोंद आदी बाबी आढळून आल्या नाहीत. त्यामुळे हा गोदामातील खताचा साठा सील करण्यात आला. अनधिकृत रासायनिक खताचा साठा बाळगून, अनधिकृत ठिकाणी ठेवून विक्री करीत असल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी अतुल वासये यांच्या फिर्यादीवरून कृष्णा चंद्रशेखर निलावार रा.भट्ट कॉलनी हिंगोली) याचेविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशाने
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे हे करीत आहेत
إرسال تعليق