कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अशोक शिरामे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इंट्री

कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अशोक शिरामे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इंट्री 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
04 जुलै 2025 
हिंगोली जिल्ह्यातील  आठरवाडी येथील रहिवासी असलेले हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे  उपसभापती तथा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रा अशोकराव शिरामे यांनी बुधवारी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महिला विकास महामंडळ येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बिडी बांगर व आमदार राजूभैया नवघरे यांच्या विनंतीला मान देत असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला त्यांच्या या प्रवेशामुळे शरद पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे .
प्रा अशोक शिरामे हे सेनगाव तालुक्यासह जिल्हाभरात ओबीसी समाजाचे मोठे नेते म्हणून परिचित आहेत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असताना ओबीसी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले व सध्या ते हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती या पदावर कार्यरत आहेत त्यांनी अचानक शरद पवारांची साथ सोडून अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने सेनगाव तालुक्यात राजकीय समीकरण बदलणार असून तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 
पुसेगाव जिल्हा परिषद गटातून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. 
 
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे प्रकाशराव थोरात रवींद्रजी गडदे  राजकुमार देशमुख वैशालीताई वाघ उत्तमराव पोले सेनगाव तालुकाध्यक्ष विकास शिंदे हिंगोली तालुकाध्यक्ष रवी डोरले यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم