फ्लिपकार्ट कंपनीच्या कंटेनर वर दरोडा टाकल्या प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर
ॲड के गायकवाड पाटील
विद्यमान अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश वसमत यांचे आदेश
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
25 जुलै 2025
सविस्तर माहिती अशी की
आरोपी ज्ञानेश्वर खानजोडे परमेश्वर चौधरी शंकर काळे मंगेश नारायण काटे व इतर आरोपी सर्व राहणार रिसोड तालुका वाशिम जिल्हा वाशिम
याच्या विरोधात दिनांक 12जून 2025 रोजी फिर्यादीने अशी फिर्याद दिली की, फिर्यादी हा त्याच्या साथीदारा बरोबर फ्लिपकार्ट कंपनीमध्ये कंटेनर ट्रक मध्ये फ्लिपकार्ट पार्सल पोहोचवण्याचे काम करीत होता दिनांक 10जून2025 सायंकाळी सहा वाजता हैदराबाद येथून पार्सल भरून ज्या ठिकाणी सामान पास करायचा आहे त्याची पोचपावती घेऊन निघाले त्यानंतर वसमत हिंगोली रिसोड सामान पोचती करून वसमत ते औंढा रोडवर दिनांक 11जून2025 रात्री साडेतीन वाजता सुमारास आरोपी यांनी अडवून मारहाण करून दरोडा टाकला अशी फिर्याद फिर्यादीने कुरुंदा पोलीस स्टेशन येथे दिली त्यावरून वरील आरोपी व आरोपी रोहित इंगोले याच्यावर गुर क्रमांक 268/2025 कलम 309 (4) 310 (2) बी एन एस प्रमाणे दाखल झाला
त्यानंतर तपासी अंमलदार यांनी तपास करून विद्यमान प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी साहेब वसमत
दिनाक 17जून25 रोजी आरोपी यांना अटक न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले परंतु रोहित इंगोले यांना अटक न झाल्यामुळे यांचा जामीन अर्ज अटकपूर्व विद्यमान अतिरिक्त जिल्हा न्यायालय वसमत येथे दिनांक 10जुलै25 रोजी दाखल केला होता त्यानंतर विद्यमान अतिरिक्त न्यायाधीश डी बी बनगडे साहेब वसमत यांनी दिनांक 23जुलै 2025 रोजी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपी रोहित इंगोले याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला
आरोपीच्या वतीने जी के गायकवाड पाटील यांनी व्यक्तिवाद केला अँड नागनाथ भोसले अँड आकाश चव्हाण अँड सुमित सातव ,अँड योगेश खिल्लारी ,अँड परमेश्वर इंगोले यांनी सहकार्य केले
إرسال تعليق