गुगुळ पिपरी येथील ग्रामपंचायत महिला सदस्यअपात्र जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आदेश

 गुगुळ पिपरी येथील ग्रामपंचायत महिला सदस्यअपात्र 
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आदेश 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
17 जुलै 2025 
हिंगोली 
 सेनगाव तालुक्यातील गुगुळपिंपरी येथील महिला ग्रामपंचायत सदस्य पार्वती नारायण इंगोले यांच्या मुलाच्या नावाने गावठाण गट क्र. 740 क्षेत्रामध्ये मालमत्ता क्रमांक 538 सचिन नारायण इंगोले एकूण क्षेत्रफळ 1089 चौ. व रामेश्वर नारायण इंगोले  मालमत्ता क्रमांक 539 मध्ये 1089 चौ. मि. अशी गावठाण जागेवर अनधिकृत ताबा करून जागेचा वापर करत होते 
 स्वतःच्या मालकीचे घर असताना सुद्धा शासकीय जमिनीमध्ये अतिक्रमण करून प्रशासनाची दिशाभूल करून ग्रामपंचायत मध्ये गावठाण  मालमत्ता लपवून ग्रामपंचायत सदस्यत्व पद ईश्वर चीठ्ठीवर प्राप्त करून घेतले होते.
 या प्रकरणांमध्ये गुगुळ पिपरी येथील बालाजी दशरथराव देशमुख यांनी ग्रामपंचायत अधिनियम1959 कलम 14 (1)ज(-३)अंतर्गत जिल्हाधिकारी साहेब यांच्या दालनामध्ये सदरचे प्रकरण अँड अजय  ऊर्फ बंटी देशमुख साहेब  यांच्या मार्फत प्रकरण 25/08/2023 रोजी दाखल केले होते.
 त्याच संदर्भामध्ये  दि. 15/07/2025 रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ग्रामपंचायत सदस्य पार्वती नारायण इंगोले यांना अपात्र ठरवले असा आदेश पारित केला
 
अर्जदारा वतीने ॲड.सतिष देशमुख, ॲड.सौ.सुनिता देशमुख , ॲड.शामकांत देशमुख, ॲड.प्रदिप देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.अजय (बंटी) पंडीतराव देशमुख, यांनी  युक्तीवाद केला व त्यांना ॲड.शरद देशमुख, ॲड.अदित ऊर्फ शुभम देशमुख ,  ॲड.राहूल देशमुख,  ॲड.विराज देशमुख, ॲड.योगेश खिल्लारी (पाटील), ॲड.अविनाश राठोड ,ॲड.रजत देशमुख, ॲड.प्रकाश मगरे, ॲड.आनंद खिल्लारे, ॲड.सुमित सातव, ॲड.मुदस्सीर अ.रहिम, ॲड.लखन पठाडे,ॲड.श्रध्दा जैस्वाल , ॲड.आकाश चव्हाण, ॲड.शुभम मुदिराज , ॲड.गजानन घुगे, ॲड.सुजित गायकवाड,ॲड.सुमित कदम, ॲड. तुषार पवार ,अँड रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीस यांनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم