10 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील प्रमुख आरोपीस तात्पुरता जामीन मंजूर
ॲड अजय उर्फ बंटी देशमुख
महाराष्ट्र 24, न्यूज नेटवर्क
10 सप्टेंबर 2025
श्री कुलस्वामीनी महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी आर्थिक घोटाळा प्रकरण
हिंगोलीतील
श्री कुलस्वामीनी महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड, येथील सुमारे 10.68 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी बजरंग जगन्नाथ खर्जुळे यास हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे.
सदर प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, लेखपाल संजय सिताराम जाजू यांनी दिनांक 06 डिसेंबर 2023 रोजी हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, संस्थेच्या संचालक मंडळाने एकूण 4810 ठेवीदारांना अधिक परताव्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली. यामध्ये संस्थेच्या खात्यावर जमा असलेल्या ₹10,68,41,433 इतक्या प्रचंड रकमेचा अपहार झाल्याचा आरोप आहे.
या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 934/2023 नुसार IPC कलम 420, 408, 409, 120(ब) तसेच MPID कायद्याचे कलम 3 व 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील अटक आरोपी बजरंग खर्जुळे याने ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत तात्पुरता जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी, माननीय सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एन. माने मॅडम यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपीस तात्पुरता जामीन मंजूर केला.
या खटल्यात आरोपीच्या बाजूने प्रभावी युक्तिवाद करणाऱ्या ॲड. अजय (बंटी) देशमुख यांना खालील नामवंत विधिज्ञांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले –
ॲड. सतिष देशमुख, ॲड. शामकांत देशमुख, ॲड. प्रदीप देशमुख, तसेच ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित उर्फ शुभम देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. अविनाश राठोड, ॲड. रजत देशमुख, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. सुमित सातव, ॲड. मुदस्सीर अ. रहिम, ॲड. लखन पठाडे, ॲड. श्रद्धा जैस्वाल, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. शुभम मुदिराज, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुजित गायकवाड, ॲड. सुमित कदम, ॲड. तुषार पवार, अँड. रुपाली खिल्लारे मॅडम, शेख आदिल शेख अजीस, ॲड. तुषार देशमुख, ॲड. सचिन सोनुने यांनी सक्रिय भूमिका बजावली.
या निकालामुळे प्रकरणात नवीन वळण आले असून, पोलीस तपास अद्याप सुरूच आहे. संबंधित ठेवीदार व शहरवासीय याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.
إرسال تعليق