स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानाचा हिंगोली जिल्ह्यात उत्साहात शुभारंभ
हिंगोली, 18 सप्टेंबर:
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
देशभरात राबविण्यात येणाऱ्या “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या आरोग्यविषयक व्यापक अभियानाचा हिंगोली जिल्ह्यात उत्साहात शुभारंभ करण्यात आला. याचा राष्ट्रीय शुभारंभ इंदूर, मध्य प्रदेश येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला. या थेट प्रक्षेपणाचे आयोजन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्श खाली जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे करण्यात आले होते.
जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा भव्य आणि उत्साहपूर्ण!
हिंगोली जिल्ह्यातील या अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा रुग्णालय, हिंगोली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, कुरुंदा येथे करण्यात आले होते.
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या आरोग्य अभियानासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ग्रामीण व शहरी भागातील महिलांमध्ये आरोग्याबाबत जागृती निर्माण करणारे हे अभियान जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
दररोज मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यामध्ये २० प्रकारच्या आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातील.
अभियानाचे मुख्य उद्दिष्ट:
महिलांना स्तन व गर्भाशयाच्या कर्करोगाची प्राथमिक तपासणी
रक्तदाब व मधुमेहाची तपासणी
एनसीडी तपासणी, क्षयरोग तपासणी
किशोरवयीन मुलींसाठी अशक्तपणा तपासणी व समुपदेशन
सिकलसेल स्क्रिनिंग, कार्ड वितरण व समुपदेशन
गर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व काळजी तपासणी, हिमोग्लोबिन पडताळणी
माता व बाल संरक्षण कार्डचे वितरण
बालकांचे लसीकरण, मासिक पाळी स्वच्छता व पोषणावर जनजागृती
महिला बचत गट आणि पंचायती राज संस्थांच्या माध्यमातून साखर आणि तेल वापर कमी करण्याबाबत मोहीम
पोषण समुपदेशन, रक्तदान मोहीम
आयुष्मान भारत योजनेंतर्गत नोंदणी व वंदना कार्ड वितरण
निश्चय मित्र स्वयंसेविका नोंदणी
उपस्थित मान्यवर आणि अधिकारी:
या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी खालील प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते:
डॉ. कैलास शेळके – जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. चक्रधर मुंगल – अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
डॉ. नितीन तडस – जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. सतीश रुणवाल – अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी
डॉ. दीपक मोरे, डॉ. पांडुरंग फोपसे, डॉ. शैलेजा – अभियान नोडल अधिकारी
डॉ. सुवर्णा महाले, डॉ. फजल, डॉ. प्रकाश जाधव, डॉ. बालाजी भाकरे, डॉ. इनाईतुला खान,
श्री. अमोल कुलकर्णी, मनिषा वडकुते, तसेच जिल्हा रुग्णालयाचे सर्व डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी
जिल्हाधिकारी यांचे आवाहन:
> “प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील सर्व महिला व माता यांना या तपासणी शिबिरांसाठी पाठवावे.
आरोग्यदायी महिला म्हणजे सशक्त कुटुंब आणि समाज.
या अभियानाचा लाभ प्रत्येक महिलेला मिळवून द्या,”
असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश,
डॉ. कैलास शेळके, डॉ. चक्रधर मुंगल, व इतर मान्यवरांनी केले.
महत्त्वाचा संदेश:
> “महिलांचे आरोग्य सक्षम झाले, तर कुटुंब आणि समाज अधिक सशक्त बनेल.”
या संकल्पनेवर आधारित हे अभियान हिंगोली जिल्ह्यातील महिलांसाठी आरोग्याचे संजीवनी ठरणार आहे.
إرسال تعليق