हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई!
कळमनुरी तालुक्यातील हारवाडी येथील शेळी चोरी प्रकरणातील गुन्हेगार जेरबंद – १०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त!
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
15 सप्टेंबर 2025
हिंगोली :
कळमनुरी तालुक्यातील मौजा हारवाडी येथे घडलेल्या शेळी चोरी प्रकरणातील गुन्हेगारांना हिंगोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत अटक करून मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर प्रकरणात बुलढाणा जिल्ह्यातील अंबीकापूर (चितोडा) येथील तिघा गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे १० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील:
दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी, रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सखाराम कान्होजी हराळ (वय – ७५ वर्ष, व्यवसाय – शेती व शेळी पालन, रा. हारवाडी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) यांच्या अखाड्यावरून काही अज्ञात इसमांनी त्यांच्या शेळ्या चोरी केल्या. यावरून पोलीस ठाणे कळमनुरी येथे गुन्हा रजि. नं. ४८९/२०२५, भा.दं.वि. कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेची गुप्त माहितीवरून कारवाई:
दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि माधव जिव्हारे व पोलीस अंमलदार शेख शकील यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, हारवाडी येथून चोरी गेलेल्या शेळ्यांमध्ये सामील असलेले गुन्हेगार खामगाव येथून वाशिम मार्गे नांदेडकडे जाणार आहेत.
त्यानुसार बासंबा टी पॉईंट येथे सापळा रचून खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले:
. प्रदीप बाबुराव हिवराले (वय – २९ वर्ष, व्यवसाय – चालक)
रविकांत उर्फ जनार्धन हिवराले
अतुल उर्फ गजानन प्रकाश हिवराले
(सर्व रा. अंबीकापूर (चितोडा), ता. खामगाव, जि. बुलढाणा)
जप्त मुद्देमाल:
अनुक्रमांक मुद्देमाल तपशील अंदाजित किंमत
वाहन पांढऱ्या रंगाची टोयोटा इटीयॉस (क्रमांक M.H.15 DS 4447) ₹5,00,000/-
2 वाहन पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर (क्रमांक M.H.14 FC 4531) ₹5,00,000/-
3 रोख रक्कम चोरीतून मिळवलेली रक्कम ₹40,000/-
एकूण ₹10,40,000/-
ही कामगिरी कोणी बजावली
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. कमलेश मीना, व स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सदर पथकात खालील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते:
पोउपनि माधव जिव्हारे
पोउपनि विक्रम विठुबोने
पोलीस अंमलदार शेख शकील, सुभाष घुगे, विक्रम कुंदनानी, आझम प्यारेवाले, शंकर हराळ, दत्ता नागरे, इरफान पठाण, प्रदीप झुंगरे, मारोती काकडे
शेतकऱ्यांना दिलासा – पोलिसांचे कौतुक!
या कारवाईमुळे शेळीपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुन्हेगारांना अटक झाल्याने भविष्यातील जनावर चोरीच्या घटना रोखण्यास मदत होणार आहे. हिंगोली पोलीस दलाच्या या धाडसी व तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
إرسال تعليق