हिंगोलीचा अभिमान! जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना स्कॉच अवॉर्डने सन्मानित – ‘संजीवनी अभियान’ला देशात पहिला क्रमांक
२४ सप्टेंबर 2025
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘संजीवनी अभियान’ ला देशपातळीवर प्रथम क्रमांकाचा स्कॉच अवॉर्ड प्राप्त झाला आहे. या गौरवासाठी श्री. गुप्ता यांना २० सप्टेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या भव्य समारंभात गौरवचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या अभियानाच्या माध्यमातून गर्भाशयमुख, स्तन व मुख कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे लवकर निदान आणि उपचार या उद्दिष्टाने हिंगोली जिल्ह्यात व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सामान्य रुग्णालयाच्या सहकार्याने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अतिशय प्रभावीपणे पार पडला.
दरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉक्टर कैलास शेळके यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला
यावेळी डॉक्टर सतीश रुणवाल डॉक्टर जोगदंड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते
आंतरराष्ट्रीय महिला दिन (८ मार्च २०२५) रोजी आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या अभियानात, ३० वर्षांवरील नागरिकांचे आशा स्वयंसेविकांमार्फत सर्वेक्षण, नोंदणी, तपासणी आणि उपचार या सर्व टप्प्यांचे अत्यंत काटेकोर आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावर राहुल गुप्ता यांनी केलेल्या प्रभावी सादरीकरणामुळे, हिंगोलीच्या या अभिनव उपक्रमाला देशातील इतर सर्व राज्यांना मागे टाकून पहिला क्रमांक मिळाला.
हिंगोली जिल्ह्याच्या या उज्ज्वल यशामुळे संपूर्ण राज्यात व देशभरात कौतुकाचे व अभिनंदनाचे वातावरण निर्माण झाले आहे. पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून जिल्हाधिकारी गुप्ता यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा