हिंगोली जिल्ह्यात दुहेरी खून गोळीबाराची थरारक घटना
गोळीबार करणारे आरोपी अटक
पोलीस निरीक्षक श्याम कुमार डोंगरे
भांडेगाव येथे पिस्तूलाने गोळीबार; दोन ठार, दोन गंभीर जखमी | कौटुंबिक वादातून रक्तरंजित हल्ला | पोलिसांत गुन्हा दाखल |
हिंगोली, ता. २४ सप्टेंबर २०२५ – हिंगोली जिल्ह्यातील भांडेगाव येथे काल रात्रीच्या सुमारास एका गंभीर आणि धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. केवळ लघवी करण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद दुहेरी खून आणि गोळीबारात परिवर्तित झाला. यामध्ये दोन जण ठार झाले असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
घटना कधी घडली
दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास, भांडेगाव येथे ही घटना घडली. ही घटना आरोपींच्या घरासमोर असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर, अंतर्गत घडली.
फिर्यादी कोण आणि त्यांची तक्रार काय?
फिर्यादी गजानन सोनाजी जगताप (वय ४३, व्यवसाय – शेती) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच गावातील असून त्यांच्यात पूर्वीपासून कौटुंबिक वाद होते.
कोण ठार झाले
कुंडलीक बापुराव जगताप (वय ४० वर्ष) – फिर्यादीचा भाऊ
शिवराज कुंडलीक जगताप (वय २० वर्ष) – फिर्यादीचा पुतण्या
हे दोघेही घटनास्थळी गोळीबारात ठार झाले.
कोण गंभीर जखमी झाले
सुभाष विठ्ठल कुरुवाडे (वय ३६ वर्ष)
बालाजी सखाराम जगताप (वय ३४ वर्ष)
या दोघांवर देखील पिस्तुलाने गोळीबार करण्यात आला असून ते गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटना कशी घडली
फिर्यादीच्या माहितीनुसार, आरोपी क्र. ४ आणि ५ यांनी मयतांच्या घरासमोर लघवी केली. यावरून वाद निर्माण झाला. मयत आणि जखमी हे समजवण्यासाठी आरोपींच्या घरी गेले असता, तिथे आधीच वादग्रस्त वातावरण होते.
आरोपी क्र. १ ते ५ यांनी एकत्र येत, “आज तुम्हाला संपवतोच” असे म्हणत शिवीगाळ केली.
आरोपी क्र. ३ ने आरोपी क्र. १ ला “पिस्तुल आणा” असे सांगितले.
त्यावर आरोपी क्र. १ ने घरातून पिस्तुल आणून, आरोपी क्र. २ च्या मदतीने गोळीबार केला, ज्यात दोन ठार आणि दोन गंभीर जखमी झाले.
कोणावर गुन्हा दाखल झाला आहे?
आरोपींची नावे:
लक्ष्मण उर्फ बाबाराव रायाजी जगताप
विठ्ठल लक्ष्मण जगताप
ज्ञानेश्वर लक्ष्मण जगताप
केदार नामदेव जगताप
. उमेश गंगाराम उबाळे
सर्व आरोपी भांडेगाव, ता. हिंगोली येथील रहिवासी आहेत.
कायदेशीर कारवाई व गुन्ह्यांचे कलम:
गुन्हा क्र. 540/2025 खाली कलम 103(1), 109(1), 118(2), 115(2), 352, 351(3), 189(2)(4), 191(3), 190 भा.दं.वि. तसेच शस्त्र अधिनियमातील कलम 3/25 अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस तपास:
या गुन्ह्याचा तपास तपास मा.पो.नि. एस.पी. डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सद्यस्थिती व पुढील कारवाई:
पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.
परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा