अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्यात आज शाळांना सुट्टी जाहीर!
हिंगोली-पुसद मार्ग बंद | जिल्ह्यातील सर्व नद्यांना महापूर मराठवाडा-विदर्भाचा संपर्क तुटला
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
27 सप्टेंबर 2025
हिंगोली जिल्ह्यात गेले काही तास सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आज शनिवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय, अनुदानित व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना तात्काळ सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) श्री. प्रशांत दिग्रसकर यांनी ही माहिती दिली असून, सर्व गटशिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांना त्वरीत ही सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमध्ये पोहोचवण्यास सांगितले आहे.
हिंगोली-पुसद मार्ग जलमय, वाहतूक ठप्प!
अतिवृष्टीमुळे हिंगोली-पुसद मार्ग पूर्णतः बंद झाला असून अनेक भागांत रस्ते जलमय झाले आहेत. जिल्ह्यातील अनेक नद्यांना महापूर आला असून, काही ठिकाणी पूररेषा ओलांडली गेली आहे. मराठवाडा व विदर्भाचा संपर्क पूर्णतः तुटला आहे.
प्रशासनाचा इशारा: पुलावरून पाणी जात असताना रस्ता ओलांडू नका!
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचे आवाहन केले आहे. पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही रस्ता ओलांडू नये, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून, हवामान खात्याच्या इशाऱ्यावर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.
पालक आपल्या मुलांना शाळेला सुट्टी जाहीर झाल्यामुळे परत घराकडे नेताना
परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जाणार
या अतिवृष्टीमुळे काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शाळांना सुट्टीचा निर्णय विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घेतला गेला आहे. पुढील निर्णय हवामान परिस्थितीनुसार घेतले जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
إرسال تعليق