हिंगोली शहरात मोकाट जनावरांविरोधात संयुक्त मोहीम – पोलिस व नगरपालिकेची कडक कारवाई सुरू

हिंगोली शहरात मोकाट जनावरांविरोधात संयुक्त मोहीम – पोलिस व नगरपालिकेची कडक कारवाई सुरू

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
२३ सप्टेंबर 2025 
हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या मोकाट जनावरांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी हिंगोली नगरपरिषद व शहर पोलिस विभागाने संयुक्त मोहीम राबवत मोकाट जनावरे पकडण्याची कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेचे नेतृत्व हिंगोली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे  नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे तसेच हिंगोली शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांनी केले.
धरपकड कारवाईत 
हिंगोली शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व नगरपालिकेचे काही कर्मचारी सहभागी झाले होते 
या संयुक्त पथकाने शहरातील विविध भागांतून मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पकडून सुरक्षित ठिकाणी हलवले असून, शहरातील जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ही कारवाई शहरातील वाहतुकीला अडथळा आणणारी, अपघाताला कारणीभूत ठरणारी तसेच सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणारी जनावरे हटवण्यासाठी करण्यात आली आहे.

नगरपालिका व पोलिस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, पुढील काळात शहरात जर पुन्हा मोकाट जनावरे दिसून आले, तर त्यांच्या मालकांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यामुळे सर्व जनावरांचे मालक आपल्या जनावरांची जबाबदारी घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
नागरिकांना आवाहन – जर कोणत्याही भागात मोकाट जनावरे दिसून आली, तर नागरिकांनी त्वरित नगरपालिका किंवा पोलिस स्टेशनला माहिती द्यावी, जेणेकरून वेळेवर योग्य ती कारवाई करता येईल.

शहर स्वच्छ, सुरक्षित आणि अनुशासित ठेवण्यासाठी प्रशासन सातत्याने कार्यरत आहे. नागरिकांनी देखील सहकार्य करून शहराच्या सुरळीत व्यवस्थेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे

मोहिमेत मोकट  जनावर पकडलेले सध्या कल्याण मंडप येथे  
देखरेखी  खाली  ठेवण्यात आले आहेत

Post a Comment

أحدث أقدم