१२ लाख रुपयांच्या घरफोडीप्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर
हिंगोली, दि. ५ सप्टेंबर २०२५ –
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली शहर व ग्रामीण परिसरात दोन घरफोडी प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सदर आरोपीने अॅड. अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत न्यायालयात जामीन अर्ज सादर केला होता.
घटनांची पार्श्वभूमी
१) बांगर नगर, हिंगोली शहर:
दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी बांगर नगर येथे घडलेल्या घरफोडीमध्ये फिर्यादीने सुमारे ₹४,६५,०००/- चा मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली होती. यावरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६१४/२०२५, कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२) कारवाडी, हिंगोली ग्रामीण:
याआधी, दि. १४ जुलै २०२५ रोजी कारवाडी येथे दुसऱ्या घरफोडीची घटना घडली होती. येथेही अज्ञात आरोपीविरोधात गु.र.नं. ४१३/२०२५, कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या दोन्ही प्रकरणात दत्ता विठ्ठल खांडेकर या आरोपीस अटक करण्यात आली होती.
जामीन अर्ज व न्यायालयीन निर्णय
सदर आरोपीच्या वतीने अॅड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, हिंगोली यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला होता. सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.
वकील पथकाचे सहकार्य
या युक्तिवादात अॅड. अजय देशमुख यांना ज्येष्ठ वकील अॅड. सतीश देशमुख, अॅड. शामकांत देशमुख, अॅड. प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच खालील वकिलांनीही या प्रकरणात सहकार्य केले: अॅड. शरद देशमुख अॅड. अदित उर्फ शुभम देशमुख अॅड. राहुल देशमुख अॅड. योगेश खिल्लारी (पाटील) अॅड. विराज देशमुख अॅड. अविनाश राठोड अॅड. रजत देशमुख अॅड. प्रकाश मगरे अॅड. आनंद खिल्लारे अॅड. सुमित सातव अॅड. मूदस्सीर अ.रहिम अॅड. लखन पठाडे अॅड. श्रद्धा जैस्वाल अॅड. आकाश चव्हाण अॅड. शुभम मुदिराज अॅड. गजानन घुगे अॅड. सुजित गायकवाड अॅड. सुमित कदम अॅड. तुषार अॅड. रुपाली खिल्लारे मॅडम शेख आदील शेख अजीजअॅड. तुषार देशमुख अॅड. सोनुने
या संपूर्ण वकील पथकाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आरोपीला जामीन मंजूर झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
إرسال تعليق