डीपीसीएल क्रिकेट स्पर्धेचे २६ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते भव्य उदघाटन

डीपीसीएल क्रिकेट स्पर्धेचे २६ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते भव्य उदघाटन

दसरा समिती आणि पत्रकार संघाचा पुढाकार : आठ संघांची चुरशीची लढत
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
16 सप्टेंबर 2025 
हिंगोली – येथील ऐतिहासिक सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या १७१ व्या वर्षानिमित्त यंदा प्रथमच "दसरा प्रीमियर क्रिकेट लीग (DPCL)" या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता, संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर या स्पर्धेचे उदघाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या उपक्रमामागे सार्वजनिक दसरा महोत्सव समिती आणि पत्रकार संघाचा पुढाकार असून, यामुळे १७० वर्षांच्या परंपरेत प्रथमच ऐतिहासिक दसऱ्यात क्रिकेटचा समावेश होणार आहे. म्हैसूरनंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या हिंगोली दसऱ्याच्या इतिहासात हे एक आगळंवेगळं पाऊल मानलं जात आहे.

उदघाटन समारंभास पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे, तसेच सार्वजनिक दसरा समितीचे पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी, व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
८ संघांची चुरशीची स्पर्धा
या डीपीसीएल स्पर्धेत आठ संघांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये पुढील संघ सहभागी आहेत:
पालिका संघ
पत्रकार संघ
महावितरण (विजवितरण कंपनी)
वन विभाग संघ
महसूल विभाग संघ
पोलीस विभाग संघ
व्यापारी संघ
अन्य एक निमंत्रित संघ
या संघांना दोन गटांत विभागण्यात आले असून, लीग फॉरमॅटमध्ये सामने खेळविले जाणार आहेत. प्रत्येक गटातील विजयी संघ अंतिम सामन्यास पात्र ठरणार असून, अंतिम सामना दोन गटातील सर्वोत्तम संघांमध्ये खेळविला जाईल.

पत्रकार संघ विरुद्ध पोलीस संघ  एक रोचक लढत निश्चित!

या स्पर्धेत पोलीस संघ बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो, मात्र पत्रकार संघाने देखील यंदा भक्कम तयारी केली असून तो आता कोणत्याही संघापुढे कमी नाही. पत्रकार संघाची रणनीती आणि शेवटच्या क्षणी विजय खेचून आणण्याची क्षमता ह्या स्पर्धेला अधिक चुरशीची बनवते. त्यामुळे या दोघांमध्ये होणारी लढत ही खास आकर्षण ठरणार आहे.


जिल्हाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या उपक्रमाला खुद्द जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला आहे. त्यांनी या अभिनव संकल्पनेचे कौतुक करत याला पुढील वर्षी अधिक भव्य स्वरूप देण्याचा निर्णय घेतला आहे.

Post a Comment

أحدث أقدم