हिंदूराष्ट्र सेनेच्या बुलंद झेंड्याखाली श्री. गजानन बाबाराव शिंदे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती!

हिंदूराष्ट्र सेनेच्या बुलंद झेंड्याखाली श्री. गजानन बाबाराव शिंदे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती!

06 ऑक्टोबर 2025 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली जिल्ह्यातील 
नरसी  (नामदेव), केसापूर प्रतिनिधी:
देव, देश आणि धर्मासाठी अखंड झिजणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य मान-सन्मान मिळावा या हेतूने, हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. श्री. गजानन बबनराव  शिंदे (निवासी – केसापूर) यांची हिंदूराष्ट्र सेना नरसी  (नामदेव) पोलीस स्टेशन हद्दीसाठी जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी सत्कार करताना अनिल मुसळे महाराज केशव महाराज टेकाळे गणेश गुगळे उद्धव पवार 
सुरेश टेकाळे रमेश शिंदे सतीश पवार  किसन पवार सोपान शिंदे सुमित बच्चालो 
ही नियुक्ती हिंदूराष्ट्र सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष हिंदुतेजसुर्य मा. धनंजयभाई देसाई यांच्या आशिर्वादाने व मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

श्री.  शिंदे  हे गेल्या अनेक वर्षांपासून हिंदुत्वाचा जागर, राष्ट्रभक्तीची मशाल आणि सामाजिक प्रबोधनाचे कार्य निस्वार्थ भावनेने करत आले आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांची आणि संघटन कौशल्याची दखल घेत त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

या निवडीबाबत हिंदूराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष मा. रामप्रसाद ज्ञानबाराव टेकाळे यांनी सांगितले की,

> "संघटनेचे विचार, ध्येयधोरण आणि कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे, नव्या कार्यकर्त्यांची फळी तयार करणे आणि संघटनेला मुख्य प्रवाहात आणणे ही महत्त्वाची जबाबदारी श्री. शिंदे यांच्यावर असेल. आम्हाला खात्री आहे की, ते ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील."

या निवडीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्री.  शिंदे  यांचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم