हिंगोली महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीतील 30.78 कोटी अपहार प्रकरणातील कॅशियर व पदाधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
9 डिसेंबर2025
हिंगोली महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीमध्ये तब्बल 30.78 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात नोंदवलेल्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपींना आज विहित सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
🔶 प्रकरणाचा सविस्तर तपशील
फिर्यादी अर्पित कमलकिशोर बगडिया यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156(3) अन्वये दिलेल्या अर्जाच्या आधारावर, हिंगोली शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 640/2021 हा गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्हा कलम 420, 408, 409, 465, 467, 468, 471, 120(B) भादंवि तसेच MPID Act चे कलम 3 व 4 अन्वये दिनांक 19/08/2025 रोजी दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीच्या आरोपानुसार—
संस्थेच्या संचालक मंडळातील सदस्य, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी 01/04/2018 ते 31/03/2024 या कालावधीत कट रचून ठेविदारांची फसवणूक केली.
एकूण 30,78,96,676 रुपये अफरातफर करून त्यापैकी 4,43,91,675 रुपये अपहार केल्याचे आरोपपत्रात नमूद आहे.
🔷 आरोपींची नावे
- दिव्या दुर्गादास खर्जुळे
- ज्योती गणेश गंगावणे
- मोनाली बजरंग अंबेकर
- अजिंक्य अंबादास खर्जुळे
- जगन्नाथ खर्जुळे
या सर्वांनी वि. जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांच्यामार्फत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
🔶 न्यायालयाचा निर्णय
दि. 09 डिसेंबर 2025 रोजी वि. सत्र न्यायाधीश श्री. विश्वास एस. माने यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
🔷 आरोपींच्या बाजूने युक्तिवाद करणारे अधिवक्ते
मुख्य मार्गदर्शन –
- ॲड. सतिष देशमुख
- ॲड. शामकांत देशमुख
- ॲड. प्रदीप देशमुख
प्रतिनिधित्व –
- ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख
सहकार्य –
ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित ऊर्फ शुभम देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. अविनाश राठोड, ॲड. रजत देशमुख, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. सुमित सातव, ॲड. मुदस्सीर अ. रहिम, ॲड. लखन पठाडे, ॲड. श्रद्धा जैस्वाल, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. शुभम मुदिराज, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुजित गायकवाड, ॲड. सुमित कदम, ॲड. विराज देशमुख, तुषार पवार, अँड. रुपाली खिल्लारे, मॅडम शेख आदील शेख अजीस, ॲड. शिवम देशमुख, ॲड. संदीप डवले, ॲड. तुषार देशमुख, ॲड. सचिन सोनुने.
إرسال تعليق