जीवे मारण्याच्या उद्देशाने झालेल्या मारहाण प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर


जीवे मारण्याच्या उद्देशाने झालेल्या मारहाण प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क 
08 जानेवारी 2025
सेनगाव तालुक्यातील धुमाळ गल्ली परिसरात जीवे मारण्याच्या उद्देशाने झालेल्या गंभीर मारहाण प्रकरणात विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथील मा. न्यायाधीश श्री. देशमुख साहेब यांनी आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणात फिर्यादीने दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सेनगाव पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी
अश्विनी प्रकाश हरण, लक्ष्मी गणेश हरण, शिवकन्या संतोष हरण
(रा. धुमाळ गल्ली, सेनगाव, ता. सेनगाव, जि. हिंगोली)
यांच्यासह इतर आरोपींनी संगनमताने फिर्यादीवर चाकू व दगडी विटांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता.
या तक्रारीवरून सेनगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 589/2025 अन्वये
कलम 109 (307), 118(1), 125, 189(2), 190, 191(2)(3), 351(2)(3), 352 भा.न्या.सं.
प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावर दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकून मा. न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
आरोपींच्या वतीने अ‍ॅड. जी. के. गायकवाड पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. त्यांना अ‍ॅड. ओम पतंगे, अ‍ॅड. परमेश्वर इंगोले जवळेकर तसेच अ‍ॅड. रवी कडतीकर यांनी सहकार्य केले.
या निर्णयामुळे संबंधित प्रकरणात आरोपींना मोठा दिलासा मिळाला असून, या आदेशाची चर्चा जिल्ह्यातील कायदेविषयक वर्तुळात होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم