अरुणोदय सिकलसेल अभियान तपासणीत जिल्ह्यात आढळला एक रुग्ण.

अरुणोदय सिकलसेल अभियान तपासणीत जिल्ह्यात आढळला एक रुग्ण.
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क 
03 फेब्रुवारी 2026
हिंगोली जिल्ह्यात अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात  येत आहे.या अभियान दरम्यान 
 15 ते 20 जानेवारी सिकलसेल रुग्ण व  सिकलसेल वाहक व्यक्तींची याद्या तयार करण्यात आल्या.
 21 ते 26 जानेवारी झिरो ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तीची सिकलसेल तपासणी आणि 
 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान आवश्यकतेनुसार लेक्ट्रोफोरेसिस टेस्ट करण्यात येत आहे तसेच 
 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत रुग्ण व वाहक यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.
मोहिमे पुर्वी जिल्ह्यात एकूण रुग्ण 116 व वाहक 959 एवढे होते आता अरुणोदय सिकलसेल तपासणीत एक रुग्ण व 63 वाहक एवढे आढळून आले आहेत. 
  सिकलसेल आजार हा आनुवंशिक असल्याने तो माता-पित्याकडून मुलांकडे जातो. ही साखळी तोडण्यासाठी विवाहापूर्वी सिकलसेल तपासणी व रुग्ण व वाहक यांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे. सिकलसेल आजारात लाल रक्तपेशी या विळ्याच्या आकाराच्या व ताठर असतात. सशक्त लाल रक्त पेशी रक्त वाहिन्यांतून सरळ निघून जातात. परंतु, सिकलसेल आजाराच्या रक्तपेशी वाहिन्यांना चिकटून राहतात. त्यामुळे अडथळा निर्माण होऊन त्या भागातील रक्तपुरवठा खंडित होतो. त्याला 'सिकलसेल क्रायसिस' म्हणतात. यामुळे असह्य वेदना होतात. अशी इजा वारंवार झाल्यामुळे अवयवाला जबरदस्त इजा होऊन तो अवयव निकामी होतो. शासकीय आरोग्य संस्थेत सिकलसेल तपासणी व औषधोपचार पूर्णपणे मोफत आहे सिकलसेल मुक्त हिंगोली जिल्हा घडविण्यासाठी  40 वर्ष वयोगटातील सर्व नागरिकांनी व गरोदर माता यांनी जवळच्या आरोग्य संस्थेत जाऊन व आरोग्य कर्मचाऱ्यांशी समन्वय ठेवून आपली सिकलसेल ॲनिमियाची तपासणी करून घ्यावी
  असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले.
सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाची  प्रभावीपणे जनजागृती करण्यात येत आहे

Post a Comment

أحدث أقدم