हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात बालक बेपत्ता प्रकरणी गुन्हा नोंद नागरिकांना शोधासाठी आवाहन
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे
03 फेब्रुवारी 2026
हिंगोली
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका १५ वर्षीय बालकाच्या बेपत्ता होण्याची घटना समोर आली असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन: हिंगोली ग्रामीण, जि. हिंगोली
गुन्हा क्रमांक: ५१०/२०२४
लागू कलम: कलम १३७ (२) भान्यासं २०२३
फिर्यादीचे नाव: रमेश मारोती पवार (वय ३३ वर्षे)
व्यवसाय: नोकरी – अधिक्षक, बालगृह (खानापूर चित्ता)
राहणार: खानापूर चित्ता, ता. जि. हिंगोली
मोबाईल: ९३०७३२७६१५
आरोपी: अज्ञात
पिडीत / बेपत्ता बालकाचे नाव: रोहीत राहुल इंगळे
वय: १५ वर्षे
मूळ राहणार: पुर, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली
सध्या: बालगृह, खानापूर चित्ता
बालकाचे वर्णन:
वय १५ वर्षे, उंची अंदाजे ४ फूट, रंग काळा-सावळा, चेहरा उभा, अंगात पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, केस काळे, बोलीभाषा मराठी.
थोडक्यात हकीकत:
दि. ०३/१२/२०२४ रोजी सकाळी सुमारे ०९.०० वाजता फिर्यादी रमेश पवार यांनी बालगृहातून रोहीत राहुल इंगळे या बालकास विद्यासागर विद्यालय, खानापूर चित्ता येथे नेऊन सोडले. त्यानंतर सुमारे ११.०० वाजता शाळेतील बोडखे सर यांनी फोन करून सदर बालक इयत्ता ९ वीचा विद्यार्थी शाळेतून निघून गेल्याची माहिती दिली व शोध घेण्यास सांगितले.
त्यानंतर फिर्यादी व बालगृहातील कर्मचाऱ्यांनी खानापूर, हिंगोली शहर, हिंगोली रेल्वे स्टेशन तसेच कळमनुरी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध घेतला. मात्र सदर बालक कोठेही मिळून न आल्याने, त्यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले असावे असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आवाहन:
नमूद वर्णनाचा बालक कोणाला कुठेही दिसून आल्यास किंवा माहिती मिळाल्यास त्वरित पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
महत्त्वाचे संपर्क क्रमांक:
CHILDLINE: १०९८
पोलीस निरीक्षक: एस. पी. डोंगरे साहेब – मो. नं. ९८८१२७३४५६
नागरिकांनी सहकार्य करून या बालकाच्या शोधात मदत करावी, असेही पोलीस प्रशासनाने कळविले आहे.
إرسال تعليق