निवासी मूकबधिर विद्यालयात गोटरे परिवारातर्फे विद्यार्थ्यांना प्रसादरूपी अन्नदान
हिंगोली | प्रतिनिधी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
श्री गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रकट दिनाचे औचित्य साधून गोटरे परिवारातर्फे गरजवंत विद्यार्थ्यांसाठी जेवणरूपी प्रसाद वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. हिंगोली शहरातील अंधरवाडी भागात असलेल्या निवासी मूकबधिर, मतिमंद व अस्थिव्यंग विद्यालय, कमलानगर येथील विद्यार्थ्यांना स्नेहपूर्वक अन्नदान करण्यात आले.
आज दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात श्री विश्वनाथ राजेश्वर आप्पा गोटरे, सौ. रेखाबाई विश्वनाथ गोटरे व गोटरे परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रसादरूपी जेवण वाटप करण्यात आले. समाजातील विशेष गरजा असलेल्या मुलांप्रती आपुलकी, ममत्व व सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी श्री विश्वनाथ राजेश्वर आप्पा गोटरे, सौ. रेखाबाई विश्वनाथ गोटरे, श्री रुपेश त्र्यंबकआप्पा गंभीरे, प्रबलराज राहुल गोटरे, प्रक्षाली राहुल गोटरे, संतोष जिरवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच निवासी मूकबधिर विद्यालय कमलानगर, हिंगोली येथील मुख्याध्यापक अशोक पाटील, रमेश खंदारे, संभाजी गुट्टे, केशव कांगणे, शांताबाई वाबळे, कमल शिंदे यांच्यासह मतिमंद व अस्थिव्यंग विद्यालयातील लक्ष्मण मुंडे, नबीशहा, प्रकाश खिल्लारी, मंदा भरणे, नितीन भराडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून येत होता. श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त राबविण्यात आलेला हा अन्नदानाचा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असून अशा सामाजिक उपक्रमांमुळे मानवतेचा संदेश अधिक बळकट होतो, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रम शांततेत, आनंददायी वातावरणात पार पडला. गोटरे परिवाराच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे
टिप्पणी पोस्ट करा