मुजीब खा नशीब खान पठाण यांची Asi पदी
पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
9 फेब्रुवारी 2026
हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन
मुजीबखाँ नसीबखाँ पठाण, , हिंगोली मधील कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदी पदोन्नती झाल्याबद्दल हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक राहुल घुले, पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वगे यांच्यासह
पोलीस अमलदार प्रविण सुरुशे, गजानन निर्मले, शेख नूर, शेख रहिमोद्दीन आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी मुजीबखाँ पठाण यांच्या आतापर्यंतच्या सेवाकालातील प्रामाणिकपणा, शिस्तप्रियता व उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करत, पदोन्नतीबद्दल अभिनंदन केले व पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. नवीन पदावरही ते आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी यशाची कामना केली. सदर सत्कार समारंभ सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.
टिप्पणी पोस्ट करा