हनुमान नगर परिसरात मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; एक आरोपी ताब्यात, दुसरा फरार

हनुमान नगर परिसरात मटका जुगारावर पोलिसांची कारवाई; एक आरोपी ताब्यात, दुसरा फरार

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
11मार्च2026
हिंगोली,  शहरातील हनुमान नगर परिसरात सुरू असलेल्या मटका जुगारावर पोलिसांनी धाड टाकून एक आरोपीला ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी फरार झाल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 11 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 2.20 वाजण्याच्या सुमारास हनुमान नगर येथील गजानन व्हील अलायमेंटच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ‘टाईम बाजार’ नावाचा मटका जुगार खेळविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घटनास्थळी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान नितीन किशनराव कवडे (वय 31, रा. सावरखेडा, ता. जि. हिंगोली) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर अलीमखान अकबरखान पठाण (रा. राहोली बु., ता. जि. हिंगोली) हा आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
छाप्यात पोलिसांनी टाईम बाजार नावाच्या मटक्याच्या चिठ्ठ्या, कार्बन पेपर, एक बॉलपेन व रोख 1,150 रुपये असा मुद्देमाल जप्त केला. तसेच पोको कंपनीचा आकाशी रंगाचा वापरता मोबाईल फोन (किंमत अंदाजे 10 हजार रुपये) जप्त करण्यात आला. एकूण 11 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा 1887 अंतर्गत कलम 12 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून पोलीस उपनिरीक्षक नानाराव पोले यांनी लेखी फिर्याद दिली आहे.
सदर गुन्हा हिंगोली शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून आरोपी क्रमांक 1 सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, तर आरोपी क्रमांक 2 फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास  उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे पोलीस  निरीक्षक संदीप मोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक  संजय मार्के करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने