पुण्यात हुंड्यासाठी छळ प्रकरण; पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल
दि. ४ एप्रिल २०२६
हिंगोली प्रतिनिधी
कात्रज परिसरातील अंजनी नगर येथे राहणाऱ्या विवाहित महिलेवर हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. स्नेहल नितीन पवार (वय २१, रा. अंजनी नगर, कात्रज रोड, पुणे) यांनी आपल्या पतीसह सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. आरोपींमध्ये पती नितीन अजय पवार, सासरे अजय किशोर पवार, सासू रामेश्वरी अजय पवार आणि आते सासू गौरी गणेश साळुंखे यांचा समावेश आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, दिनांक २२ मे २०२२ पासून २ एप्रिल २०२६ पर्यंत सासरी तसेच माहेरी असताना आरोपींनी चारचाकी वाहन घेण्यासाठी तब्बल ८ लाख रुपयांची मागणी केली. याशिवाय “तुझ्या पोटातील बाळ माझे नाही” असे म्हणत पतीने तिला मानसिक त्रास दिला, तसेच दुसऱ्या महिलेवर प्रेम असल्याचे सांगून सहजीवन नाकारले.
तसेच फिर्यादीला वारंवार शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. थापड-बुक्यांनी मारहाण करत जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
महिला दक्षता समिती, हिंगोली यांच्या पत्रानुसार आणि फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून हा गुन्हा ४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.१८ वाजता दाखल करण्यात आला.
सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या आदेशाने पो.का
आर. जमधाडे करत असून,
या घटनेमुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविषयी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
إرسال تعليق