हिंगोली सत्र न्यायालयाचा निकाल : खुनाच्या गुन्ह्यातून दिलीप उर्फ दीपक बोरकर व सुरज जाधव निर्दोष मुक्त

हिंगोली सत्र न्यायालयाचा निकाल : दिलीप उर्फ दीपक बोरकर व सुरज जाधव निर्दोष मुक्तता 
ॲड गजानन डाळ 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
 12 एप्रिल 2026
हिंगोली, दि. १० एप्रिल २०२६ :
हिंगोली येथील सत्र न्यायालयाने सेशन्स केस क्रमांक ५६/२०२५ मध्ये महत्त्वपूर्ण निर्णय देत आरोपी दिलीप उर्फ दीपक सखाराम बोरकर आणि सुरज भारत जाधव यांना निर्दोष मुक्त केले आहे.  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. आकाली यांनी हा निकाल जाहीर केला.
 काय होता आरोप
दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) सह ३(५) अंतर्गत गंभीर गुन्ह्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र, पुराव्याअभावी न्यायालयाने BNSS कलम २५८(१) अंतर्गत त्यांची निर्दोष मुक्तता केली.

 प्रभावी युक्तिवादामुळे निकालात बदल
या खटल्यात बचाव पक्षाचे वकील ॲड. गजानन डाळ यांनी सुमारे ४० मिनिटे प्रभावी युक्तिवाद करत न्यायालयासमोर ठोस मुद्दे मांडले. त्यांच्या युक्तिवादामुळे दोन्ही आरोपींना निर्दोष मुक्तता मिळण्यास महत्त्वाची मदत झाली.
तसेच, या खटल्यात ॲड. निलेश घाणेकर यांनी व ॲड. पी. के. पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली खटला चालवला. बचाव पक्षाच्या सुसंगत व कायदेशीर मांडणीमुळे न्यायालयाने आरोपींच्या बाजूने निर्णय दिला.
याशिवाय, कायदा शाखेचे इंटर्न विद्यार्थी वेंकटेश डाळ श्रीनिवास डाळ यांनी खटल्याच्या तयारीत व सुनावणीत महत्त्वाचे सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم