दाटेगाव ग्रामपंचायतीचा उल्लेखनीय आदर्श: वर्षभरात एकही गुन्हा नोंद नाही सन्मानपत्र देऊन गौरव

दाटेगाव ग्रामपंचायतीचा उल्लेखनीय आदर्श: वर्षभरात एकही गुन्हा नोंद नाही सन्मानपत्र देऊन गौरव 
 पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे 

महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क 
16 एप्रिल 2026
हिंगोली, प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री संबंध पंचायतराज अभियानात हिंगोली जिल्ह्यातील दाटेगाव ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत गावामध्ये एकही पोलिस गुन्हा नोंदविला गेला नाही, ही अत्यंत अभिमानास्पद बाब मानली जात आहे.
या पार्श्वभूमीवर हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी गावाचे सरपंच आणि पोलीस पाटील यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला.
 गावात शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक ऐक्य राखण्यात ग्रामस्थांचा सहभाग मोठा असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी सांगितले की, “दाटेगाव हे इतर गावांसाठी एक आदर्श ठरू शकते. गावातील नागरिकांनी एकोप्याने राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली आहे, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे.”

पोलीस उपनिरीक्षक राहुल घुले  पोलिस उपनिरीक्षक  श्रीदेवी वगे हे 
अधिकारी वेळोवेळी मार्गदर्शन करतात 
गावातील नागरिकांनीही भविष्यातही असाच एकोपा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. गावात सामाजिक सलोखा आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे आश्वासन देण्यात आले.
या कार्याची दखल घेत दाटेगाव ग्रामपंचायतीला ‘आदर्श गाव’ म्हणून सन्मानित करण्यात आले असून, जिल्ह्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

Post a Comment

أحدث أقدم