गुटखा प्रकरणात आरोपीस जामीन मंजूर..अँड जी के गायकवाड पाटील

गुटखा प्रकरणात आरोपीस जामीन मंजूर..
अँड जी के  गायकवाड पाटील 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
17 एप्रिल 2026 
हिंगोली : अवैध गुटखा वाहतूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे संबंधित प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी पोलीस स्टेशन नरसी नामदेव येथे गुन्हा क्रमांक ७५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २७४, २७५, १९२ तसेच फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ॲक्ट अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. फिर्यादीस मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संबंधित आरोपी हा गिलोरी फाटा परिसरात अवैध गुटखा वाहतूक करत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीस रंगेहाथ पकडले. या कारवाईत एक मोटारसायकल व मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सचिन भीमराव मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ७ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.
दरम्यान, आरोपीच्या वतीने ॲड. जी. के. गायकवाड पाटील यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. सदर अर्जावर सुनावणी घेत विद्यमान न्यायाधीश श्रीमती एस. एन. माने यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून १३ एप्रिल २०२६ रोजी आरोपीस नियमित जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. जी. के. गायकवाड पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. एस. एस. पतंगे, ॲड. रविकुमार कडतीकर व ॲड. परमेश्वर इंगोले यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने