विनयभंग व मारहाणीच्या अट्रोसिटी प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर...
ॲड अजय उर्फ बंटी देशमुख
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
21 एप्रिल 2026
हिंगोली, प्रतिनिधी – कळमनुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंग व मारहाणीच्या गंभीर अट्रोसिटी प्रकरणातील दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली यांनी जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली होती.
सदर प्रकरणाबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी कळमनुरी पोलीस ठाण्यात फिर्यादीने तक्रार दाखल केली होती. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्याच दिवशी सकाळी अंदाजे 10.15 ते 10.30 वाजण्याच्या दरम्यान आरोपींनी फिर्यादीच्या घरी येऊन जातीवाचक शिवीगाळ केली तसेच फिर्यादीचा विनयभंग केला. यावेळी फिर्यादीच्या भावाला, आईला व वडिलांना लोखंडी रॉड व काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले होते.
या घटनेवरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 40/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 74, 76, 79, 189(2), 190, 191(2), 118(1), 115(2), 351(2), 126(2), 296, 191(3) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 मधील कलम 3(1)(w), 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या प्रकरणातील अटक आरोपी भाऊराव संभाजीराव मस्के व अंकोष रामराव मस्के यांनी जिल्हा व सत्र न्यायालय, हिंगोली येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपींच्या वतीने अॅड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी युक्तिवाद सादर केला.
दिनांक 30 मार्च 2026 रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एन. माने यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपींना जामीन मंजूर केला.
आरोपींच्या बाजूने अॅड. सतीश देशमुख, अॅड. शामकांत देशमुख, अॅड. प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. यावेळी अॅड. शरद देशमुख, अॅड. अदित उर्फ शुभम देशमुख, अॅड. राहुल देशमुख, अॅड. योगेश खिल्लारी (पाटील), अॅड. रजत देशमुख, अॅड. प्रकाश मगरे, अॅड. सुमित सातव, अॅड. आनंद खिल्लारे, अॅड. अविनाश राठोड, अॅड. मुदस्सीर अ. रहिम, अॅड. आकाश चव्हाण, अॅड. श्रद्धा जैस्वाल, अॅड. लखन पठाडे, अॅड. गजानन घुगे, अॅड. सुमित कदम, अॅड. तुषार देशमुख, अॅड. रुपाली खिल्लारे, शेख आदिल शेख अजीस, अॅड. सचिन सोनुने, अॅड. संदीप डवले, अॅड. शिवम देशमुख, अॅड. प्रिया कुरील, अॅड. हरपालसिंग सेठी, अॅड. महावीर सिंग चौहान आदींनी सहकार्य केले.
या निर्णयामुळे कायदेशीर वर्तुळात तसेच स्थानिक पातळीवर या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
إرسال تعليق