काक्रोच जनता पार्टीच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी अमोल पाटील यांची बिनविरोध निवड

काक्रोच जनता पार्टीच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी अमोल पाटील यांची बिनविरोध निवड

23मे 2026
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क |
 हिंगोली
सोशल मीडियावर तसेच डिजिटल युगात वेगाने चर्चेत आलेल्या काक्रोच जनता पार्टी (CJP) ने आता भारतात आपली संघटनात्मक बांधणी सुरू केली असून, पक्षाच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी अमोल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नांवर आवाज उठवत, बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरणाऱ्या CJP पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली येथे आनंद व्यक्त केला. जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अमोल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विजयराव फुंडगे, श्रीरंग पंडित, गजानन पाटील, शिवाजी कराळे, गजानन जाधव, शिवम धुमाळ, संतोष घोंगडे, सचिन रोकडे यांच्यासह हिंगोली जिल्ह्यातील अनेक नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी अमोल पाटील यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, युवक, सुशिक्षित बेरोजगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी पक्ष कटिबद्ध असून, आगामी काळात जिल्हाभर संघटन वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
अमोल पाटील यांच्या निवडीमुळे हिंगोली जिल्ह्यात CJP पक्षाला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم