उस्माघाताने हिंगोलीत शेतकऱ्याचा मृत्यू; घटनास्थळी पोलिसांची धाव

उस्माघाताने हिंगोलीत शेतकऱ्याचा मृत्यू; घटनास्थळी पोलिसांची धाव

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
31 मे 2026 
हिंगोली, प्रतिनिधी : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठला असून उकाड्याचा मोठा फटका सर्वसामान्यांसह शेतकरी वर्गालाही बसत आहे. अशातच उस्माघातामुळे एका 42 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिंगोली शहरातील आंबेडकर नगर परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धूधन गौतम मुळे (वय 42 वर्षे), रा. येळी, ता. जि. हिंगोली यांचा उष्णतेमुळे अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाला. जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे त्यांना उस्माघाताचा त्रास झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार असले तरी प्राथमिक माहितीनुसार हा मृत्यू उस्माघातामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्ह्यात तापमानाचा पारा सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे व उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
या घटनेमुळे येळी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

أحدث أقدم