हिंगोली ग्रामीण पोलिसांची कारवाई : दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तिघांची उतरवली नशा गुन्हे दाखल पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे

हिंगोली ग्रामीण पोलिसांची कारवाई : दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या  तिघांची उतरवली नशा   गुन्हे दाखल 
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
13 मे 2026 
हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अकोला बायपासवरील मुधरदिप पॅलेस समोरील सार्वजनिक रस्त्यावर दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तिघांविरुद्ध मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 185 अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई 12 मे 2026 रोजी सायंकाळी करण्यात आली.
पोलिस शिपाई शेख नुर शेख ताहेर (वय 42), नेमणूक हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात, नागेश रामराव वानरे (वय 33, रा. श्रीनगर, हिंगोली) याच्यावर गुन्हा क्रमांक 311/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा एमएच-38-एस-9884 क्रमांकाची मोटारसायकल दारूच्या अमलाखाली चालवत असल्याचे पोलिसांना आढळून आले. हा गुन्हा 12 मे रोजी सायंकाळी 6.47 वाजता उघडकीस आला असून रात्री 8.54 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोना बापुराव चव्हाण करीत आहेत.
दुसऱ्या प्रकरणात, गजानन प्रल्हाद चोपडे (वय 27, रा. बळसोंड, ता. जि. हिंगोली) याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक 312/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा एमएच-38-के-8583 क्रमांकाची मोटारसायकल दारू पिऊन चालवत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार सायंकाळी 6.52 वाजता घडला असून रात्री 9.09 वाजता गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोह  सुधीर  करीत आहेत.
तिसऱ्या प्रकरणात, योगेशे ज्ञानेश्वर पाटील डेंग (वय 25, रा. भाटापूर, ता. मुखेड, जि. नांदेड) याच्यावर गुन्हा क्रमांक 313/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा एमएच-26-सीएफ-2909 क्रमांकाची मोटारसायकल दारूच्या नशेत चालवत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. हा प्रकार सायंकाळी 7.09 वाजता उघडकीस आला असून रात्री 9.20 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोह  गारवे करीत आहेत.
 पुढील तपास हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आहेत

Post a Comment

أحدث أقدم