हिंगोली जिल्हा परिषदेचा ‘Tech वारी २.०’ मध्ये 8 मे रोजी होणार सन्मान
मुंबई, दि. ५ मे – राज्य शासनाच्या ‘महासाधना सप्ताह’ उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या हिंगोली जिल्हा परिषदेचा ‘Tech वारी २.०’ या विशेष कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात अधिकृत पत्र जारी केले आहे.
दि. २ ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित ‘महासाधना सप्ताह’ दरम्यान I GOT (Integrated Government Online Training) प्रणालीवर नोंदणी व प्रशिक्षण उपक्रमात हिंगोली जिल्हा परिषदेमार्फत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली. या उत्कृष्ट कार्याची दखल घेत राज्य शासनाकडून हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
सदर सन्मान सोहळा दि. ८ मे २०२६ रोजी दुपारी ३.०० ते ४.३० या वेळेत मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगण येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक गायकवाड यांना उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या वतीने आयोजित ‘Tech वारी २.०’ हा कार्यक्रम प्रशासनातील तंत्रज्ञानविषयक उपक्रमांना प्रोत्साहन देणारा असून, विविध जिल्ह्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
या सन्मानामुळे हिंगोली जिल्हा परिषदेच्या कार्याची राज्यपातळीवर दखल घेतली गेली असून, प्रशासनातील डिजिटल प्रशिक्षण उपक्रमांना अधिक चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.
إرسال تعليق